‘जेथे जातो तेथे तू (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझा सांगाती ।’ या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !

‘१०.३.२०२६ या दिवशी मी वैयक्तिक कामासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून मुंबईला जाण्यासाठी निघाले. तेव्हा काही साधकांनी मला विचारले, ‘‘तुमच्या समवेत कोण आहे ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘आपले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधिका मुंबई विमानतळावर उतरल्यावर एक अनोळखी तरुण स्वतःहून साधिकेला भेटून दुचाकी गाडीवरून साधिकेला ती रहात असलेल्या इमारतीपर्यंत पोचवणे

त्या दिवशी मी ज्या विमानातून प्रवास करणार होते, त्या विमानाने नियोजित वेळेपेक्षा एक घंटा उशिरा उड्डाण केले. मी रात्री १० वाजता मुंबई विमानतळावर पोचले. तेव्हा एक अनोळखी तरुण माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘‘तुम्ही माझ्या आजीसारख्या आहात. मी तुम्हाला घरी पोचवू का ?’’ मी त्याला होकार दिला. त्याने मला ‘कुठे जायचे आहे ?’, हे विचारून इमारतीचे नाव विचारले. मी इमारतीचे नाव सांगितल्यावर त्याने भ्रमणभाषमध्ये ‘गुगल मॅप’ वरून (टीप) मी सांगितलेले ठिकाण शोधले आणि मला त्याच्या दुचाकी गाडीवरून मी रहात असलेल्या इमारतीपर्यंत आणून पोचवले. (टीप : ठिकाण शोधण्यासाठी, मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि प्रवासाची माहिती पाहण्यासाठी वापरले जाणारे ‘ॲप’)

२. तरुणाने साधिकेला ‘देवाने तुम्हाला साहाय्य करण्यासाठी आपली भेट घडवली आहे’, असे सांगणे

श्रीमती गीता प्रभु

मी त्याला धन्यवाद देऊन सांगितले,‘‘जसे आपण अधिकोषात पैसे भरतो, तसे तुम्ही आज परोपकार करून तुमच्या कर्माच्या अधिकोषात पुण्याची भर घातली आहे.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुम्हाला पाहिले आणि मला वाटले की, ‘देवाने तुम्हाला साहाय्य करण्यासाठी आपली भेट घडवली आहे.’’ मी त्याला सांगितले, ‘‘मी ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधना करते.’’ त्या वेळी तो तरुण म्हणाला, ‘‘हो, मला ‘सनातन संस्था’ ठाऊक आहे. आम्हीही ध्यानधारणा करतो.’’

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, तुम्ही माझ्या समवेत आहात’, हा भाव माझ्या अंतरात कितपत आहे’, याविषयी मला समजत नाही; मात्र संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।’ या वचनाची प्रचीती मी घेतली. मला अशी सुंदर अनुभूती दिल्याबद्दल मी तुमच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती गीता प्रभु (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक