
समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वंशशास्त्र, सुप्रजाजननशास्त्र, आरोग्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, योगशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र इत्यादी विविध शास्त्रे, विविध विद्या आणि कला आमच्या देशात समृद्ध होत्या. जगातील मानवमात्राला आदर्शभूत मानवी जीवन या देशात सहस्रो वर्षे प्रत्यक्षात नांदले आहे. ग्रहगतीशास्त्र, ज्योतिषशास्त्रासारखे शास्त्रीय विषयांवर येथे शेकडो ग्रंथ झालेले आहेत. या संस्कृतीने जगातील मानवाच्या हिताचा जीवनमार्ग दर्शवला आहे आणि म्हणूनच ती महान आहे.

भारतीय संस्कृतीने केवळ तत्त्वज्ञान, काव्य यांसारखी शास्त्रेच दिली असे नव्हे, तर नाट्य, नृत्य, स्थापत्य, शिल्प आदी ६४ कला दिल्या आहेत. आमच्या विद्वानांना अनेक विषयांत एवढी गती होती की, ढगांच्या केवळ निरीक्षणाने पावसाच्या संदर्भात त्यांना पूर्वसूचना देता येत होत्या. याबद्दल ग्रंथ आहे. अशा विविध भौतिक शास्त्रांवरही अनेक ग्रंथ होते. भारताच्या महान संस्कृतीने इतके देऊनही दुर्दैवाने आजचा भारत स्वतःच्या महत्तम संस्कृतीपासून कुठेतरी भरकटत आहे.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (क्लोजबरी चर्च, शार्लोट (नॉर्थ कॅरोलायना), १.८.१९८०))
भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे
ध्यान
हठयोग
ध्यानाचे प्रमुख शारीरिक उपयोग !
मंत्रांसह सूर्यनमस्कार शिकून अनुभवा स्वास्थ्य आणि शक्ती !
योगाभ्यासाला विश्वविख्यात करण्यासाठी त्याला ‘निधर्मी’ करू नका !
विज्ञानाने सिद्ध केले उपवासाचे महत्त्व !