सुप्तवज्रासन या आसनाच्या अभ्यासाने शरीर वज्राच्या समान मजबूत होते. हे आसन झोपून (पडून) केले जाते. यासाठी याला ‘सुप्तवज्रासन’ म्हटले गेले आहे. याच्या अभ्यासाने पुढील लाभ होतात.
काय काय लाभ होतात या आसनाने ?
१. सर्वांत विशेष लाभ हा होतो की, एकटे हे आसन अंगठ्यापासून डोक्यापर्यंत रक्ताचा संचार करून संपूर्ण शरिराला मजबूत बनवतेे.
२. शरिराचा थकवा दूर होतो. मेरूदंड आणि कंबर लवचिक होते, तसेच छाती चौपट होते.
३. यामुळे मस्तिष्क (मेंदूच्या) नियंत्रणामध्ये पुष्कळ साहाय्य होते.
४. ७२ सहस्र नाड्यांचे केंद्र जे नाभीस्थान आहे, तेही या आसनाने ठीक होते.
५. ‘सुषुम्ना’चा मार्ग अत्यंत सोपा आहे. कुंडलिनी शक्ती सरळपणे उर्ध्वगमन करते. या आसनामध्ये ध्यान करण्याने मेरूदंडाला सरळ ठेवण्याचे श्रम करावे लागत नाहीत. त्याला आराम मिळतो.
६. सर्व अंत:स्रावी ग्रंथींना पुष्टी मिळते. त्यामुळे शारीरीक आणि आध्यात्मिक विकास सरळ होतो.
७. जठराग्नी प्रदिप्त होऊन मलावरोधाची पीडा दूर होते. धातूक्षय, पक्षाघात, क्षय, मूतखडा, बहिरेपणा, तोतरेपणा, डोळे आणि स्मरणशक्तीची दुर्बलता इत्यादी रोग दूर होतात.
८. कंबर, गुडघे इत्यादींच्या वेदनांमध्ये लाभ होतो.
९. श्वासासंबंधी आजारपणात पुष्कळ लाभ होतात.
१०. ‘टॉन्सिल्स’ आदी गळ्याचे रोग दूर होतात.
११. लहानपणापासूनच या आसनाचा अभ्यास केला गेला, तर दम्याचा आजार होत नाही.
१२. पोट, कंबर, स्तनांचा आकार न्यून होतो आणि शरीर आकर्षक बनते.
१३. घामाची दुर्गंधी दूर होते.
हे आसन करतांना काय काळजी घ्याल ?
पाठीच्या कणाच्या खालच्या भागातील दुखणे, तसेच हाडांचे दुखणे आणि ‘टीबी’ (क्षयरोग) असलेल्या रुग्णांनी जाणकार व्यक्तींना विचारल्याविना या आसनाचा अभ्यास करू नये.
(साभार : ‘योगामृत’ ग्रंथ)
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद
पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी
वर्षा ऋतूचर्या : पावसाळ्यात आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन !
जेवतांना भ्रमणभाष पहात आहात का ? वेळीच व्हा सावध !