
मागे एका व्यक्तीस मी आम्लपित्तासाठी पथ्य समजावून औषधे दिली. त्याच कालावधीत आम्ही काही डॉक्टर्स नाशिक येथे चारचाकीने चाललो होतो. वाटेत सिन्नर येथे आम्ही एका हॉटेलच्या बाहेर उभे राहून गरम गरम कांदाभजी खात होतो. तो रुग्ण बसने त्या वेळी नाशिकला चालला होता. त्याने ते बघितले आणि दुसरे दिवशी रुग्णांची गर्दी सारत तो चिकित्सालयातमध्ये घुसला आणि भांडणाच्या स्वरामध्ये मला म्हणाला, ‘‘का हो डॉक्टर, मला म्हणता तूर-हरभराडाळ वर्ज्य कर. भजी, वडापाव खाऊ नकोस आणि तुम्ही स्वतः मात्र मस्त भजी खाता हा काय प्रकार आहे ?’’ ‘काय झाले असावे’, हे मला पटकन लक्षात आले. मी लगेच त्याला म्हणालो, ‘‘पित्ताचा त्रास कुणाला आहे ?’’ तो म्हणाला, ‘‘मला.’’ ‘‘मग मला जर तो त्रास नाही, तर मी काहीही खाऊ शकतो. न खाण्याचे पथ्य तुझ्यासाठी आहे !’’ हे ऐकून तो खजील झाला.
सांगण्याचा उद्देश असा की, अशी वेळ कुणावरही येऊ नये; म्हणून आतापासून प्रकृतीप्रमाणे आणि वयाप्रमाणे त्या त्या ठिकाणच्या वातावरणाप्रमाणे अन् शरिराला सहन होईल त्याप्रमाणे आहार घ्यावा, म्हणजे तुम्ही तुमचे आरोग्य सांभाळू शकाल !
– वैद्य रामदास आव्हाड, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.
विज्ञानाने सिद्ध केले उपवासाचे महत्त्व !
नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !
पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?
भूमीवर आसन ठेवून जेवायला का बसावे ?
प्रकृतीनुसार आहाराची योजना करा !
‘फास्ट फूड’ बंद !