‘एकाग्रता’ गुणाचे महत्त्व

मानवी जीवनात निरतिशय आनंद अन् निर्भेळ समाधान लाभावे, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. जे कार्य अंगीकारले असेल, ते यशस्वी व्हावे, अशीच प्रत्येकाची इच्छा असते. ‘जीवनात खरे यश म्हणजे काय ?’, याचे आकलन होऊन कृतार्थ जीवनाचा सुखद अनुभव यावा, अशीही अपेक्षा असते. अशा कृतार्थ जीवनाचा सुखद अनुभव स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांनी घेतला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आश्चर्य वाटावे, अशी जी कामे केली, ती त्यांनी साध्य केलेल्या ‘एकाग्रता’ या एका गुणाने शक्य झाली, असा निर्वाळा त्यांनीच दिला आहे. (साभार : ग्रंथ ‘समग्र व्यक्तीमत्त्व विकास’)