
‘सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे. या भयंकर आपत्काळात केवळ साधना असेल, तरच आपण टिकू शकतो.
पण केवळ बौद्धिक स्तरावर साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन साधना करणारे काही साधक श्रद्धेच्या अभावामुळेे विकल्प, मायेचे आकर्षण, आर्थिक लोभ किंवा परिस्थिती या कारणांमुळे साधना सोडत आहेत. त्यांना वाटते की, ‘मला साधना कळली आहे. मी बाहेर राहूनही माझी साधना करू शकतो.’ विकल्प असणार्या साधकांनी त्यांच्या मनातील शंकांचे योग्य प्रकारे निरसन करून घ्यावे. मायेचे आकर्षण, आर्थिक लोभ किंवा परिस्थिती यांमुळे साधनेत खंड पडत असल्यास त्याविषयीही मार्गदर्शन घेऊन त्यावर उपाययोजना काढावी. ‘मला साधना कळली’, असे वाटत असले, तरी अंतर्मुखता आणि पुढील टप्प्यांची साधना, हे नियमित इतरांकडूनच शिकावे लागते. त्यांनीही पुढील टप्प्याची साधना शिकण्यावर भर द्यावा.
मनात विकल्प असलेले काही जण साधनेपासून दूर जातात, तसेच ते इतरांशी नकारात्मक चर्चा करून त्यांच्यात विकल्प निर्माण करतात. याचा गंभीर परिणाम साधक आणि समष्टी कार्य यांवर होतो. यामुळे पापकर्म घडते. साधकानी अशांपासून सावध आणि सतर्क रहावे.
साधकांनो, आपत्काळाची तीव्रता आणि ‘ही साधनेची शेवटची संधी असू शकते’, हे लक्षात घेऊन श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर त्या त्या वेळी मात करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२२.५.२०२६)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !