व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्‍वराची ओढ वाढते ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एक साधक, सातारा : ‘काही दिवसांपासून माझ्या मनात ‘धर्मकार्य करावे कि नाही ?’, असा नकारात्मक विचार येत होता. आता सत्संगात तुम्हाला पाहून ‘धर्मकार्य लगेच चालू करावे. आपण इतके दिवस वाया घालवले’, असे विचार माझ्या मनात येत आहेत. आता ‘मनातील नकारात्मक विचार पुसून टाकून पुन्हा धर्मकार्यासाठी उभे रहावे’, असे मला वाटत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, मनात नकारात्मक विचार न येता तिची ईश्‍वराकडील ओढ वाढत जाते. तुम्ही साधनेचे प्रयत्न आणि सेवा चालू ठेवा. साधना वाढली, म्हणजे मनातील सगळे नकारात्मक विचार आपोआप जातील.

तुम्हाला आध्यात्मिक त्रासही आहे. हा त्रास जाण्यासाठी थोडी साधना वापरली जाते आणि उर्वरित साधना साधनेत प्रगती होण्यासाठी वापरली जाते. काळजी करू नका.’

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.