नवी देहली – देशातील ए.टी.एम्.मध्ये रोख रकमेच्या उपलब्धतविषयी निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व बँकांकडून तातडीने माहिती मागवली आहे. आर्थिक सेवा विभागाने बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना ए.टी.एम्.मध्ये रोख रक्कम भरण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी येत आहेत का ?, तसेच त्या दूर करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत ?, यांविषयी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
काही आस्थापनांनी काही भागांत रोख रकमेच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्याचे ‘भारतीय बँक संघटने’च्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने परिस्थितीचा आढावा घेण्यास आरंभ केला आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये रोख व्यवहारांचे प्रमाण अद्याप मोठे असल्याने ए.टी.एम्.मधील रोख रकमेची उपलब्धता महत्त्वाची मानली जाते. सरकारी योजनांचे लाभार्थी, पेन्शनधारक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर ए.टी.एम्.वर अवलंबून असल्याने ए.टी.एम्.मधील रोख रक्कम अल्प पडल्यास त्याचा थेट परिणाम जनतेवर होऊ शकतो.
ए.टी.एम्.मधील रोख रकमेची कमतरता दूर करणार ! – भारतीय रिझर्व्ह बँक
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ए.टी.एम्.मध्ये रोख रकमेची कमतरता भासल्यास ती तातडीने भरून काढण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखाद्या ए.टी.एम्.मध्ये महिनाभरात १० घंट्यांहून अधिक काळ रोख रक्कम उपलब्ध नसल्यास संबंधित बँकेवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !