महिलांचा अपमान आणि मृतदेहाच्या अवयवाविषयी वादग्रस्त विधान करणार्या दोघांना समन्स !

मुंबई – स्टँडअप कॉमेडियन (एकल विनोदी कलाकार) प्रणित मोरे याच्या कार्यक्रमातील काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले होते. यात हिमांशू जांगरा या तरुणाने सांगितले, ‘‘मी एका तरुणीसमवेत बाहेर गेलो होतो. तेथे मी चिकन बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केले. नंतर ते पैसे मी वसूल करणार आहे.’’ तरुणाने द्विअर्थाने विधान करून महिलांचा अपमान केला होता. यावर प्रणितसह कार्यक्रमातील लोक हसले. आणखी एका व्हिडिओमध्ये डॉ. सेजल पवार हिने पुरुष रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाच्या अवयवाविषयी वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरकडून प्रणित मोरे याच्यासह इतरांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
Watch video report
pic.twitter.com/IooPiPpe8FPranit More l Himanshu Jangra l Dr Sejal Pawar #370BiryaniControversy #MaharashtraCyberPolice
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
सर्वांकडून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर डॉ. सेजल पवार हिने क्षमा मागितली आहे. (रुग्णाच्या मृतदेहाच्या संदर्भात वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी अशा आधुनिक वैद्यांचा परवानाच कायमस्वरूपी रहित करायला हवा ! – संपादक)
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !