केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान

नवी देहली – पुढील वर्षापर्यंत एक-दोन राज्ये वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा’ (अफस्पा) हटवला जाऊ शकतो, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.
आसाम-नागालँड सीमेवर तेल आणि खनिजे यांच्या उत्खननासाठी केंद्र सरकार, तसेच आसाम अन् नागालँड यांची राज्य सरकारे यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्या वेळी गृहमंत्री बोलत होते.
गृहमंत्री पुढे म्हणाले की, ईशान्य भारतात कायमस्वरूपी शांतता आणि विकास साधण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने वर्ष २०१९ पासून अनेक शांतता करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामुळे हिंसक घटनांमध्ये ८० टक्क्यांनी घट झाली असून ‘सशस्त्र दल कायद्या’च्या कक्षेत येणार्या एकूण क्षेत्रफळातही ८० टक्क्यांनी घट झाली आहे. आज संपूर्ण ईशान्य भारत ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने पुढे जात आहे. हा करार या क्षेत्राच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले