५५१ शहरांमध्ये गोपनीय साहित्य (प्रश्नपत्रिका) पोचवण्याचे दायित्व
नवी देहली – राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात् ‘नीट’ पुनर्परीक्षेसाठी गोपनीय साहित्य पोचवण्याचे दायित्व केंद्रीय निमलष्करी दले असलेली केंद्रीय राखीव पोलीस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्यावर सोपवण्यात आले आहे. ही दले ५५१ शहरांमध्ये गोपनीय परीक्षा साहित्य सुरक्षितपणे आणि कोणत्याही प्रकारची गळती (लीक) न होता पोचवण्याची निश्चिती करतील. परीक्षेचे गोपनीय साहित्य वाहून नेणार्या विमानांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सैनिक उपस्थित असतील. ‘राष्ट्रीय परीक्षा संस्थे’च्या अर्थात् ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या महासंचालकांनी केलेल्या विनंतीनंतर नेमणुकीची प्रक्रिया चालू करण्यात आली. देशभरातील परीक्षा केंद्रांवर २१ जूनला ‘नीट’ची पुनर्परीक्षा होणार आहे.
गोपनीय परीक्षा साहित्य कर्णावती आणि भाग्यनगर येथील मूळ केंद्रांतून देशभरातील ५५१ शहरांपर्यंत पोचवले जाणार आहे. साहित्याची वाहतूक आणि हाताळणी या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे.

अनैतिकतेचा बाजार !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार !
ग्राहकांना प्रतिदिन मिळणार अधिकाधिक २०० लिटर डिझेल !
Pakistani Brutality Rawalakot PoK : रावलकोट (पाकव्याप्त काश्मीर) : पाक सैन्याने पुन्हा केले १६ नागरिकांना ठार !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’चा मसुदा म्हणजे देवभूमीचे खासगीकरण आणि देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला !