मनुष्याच्या दोन्ही हातांच्या तळव्यांच्या रंगाची छटा वेगवेगळी असण्याचे कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मनुष्याच्या दोन्ही हातांच्या तळव्यांच्या रंगाची छटा वेगवेगळी का असते ? मनुष्याच्या उजव्या तळहातापेक्षा त्याचा डावा तळहात गोरा का दिसतो ?’

श्री. राम होनप :

श्री. राम होनप

१. व्यक्तीचे संचित आणि प्रारब्ध यांचा तिच्या बुद्धीशी असलेला संबंध

‘व्यक्तीच्या यापूर्वी झालेल्या अनेक जन्मांत तिने चांगली-वाईट कर्मे केलेली असतात. हे तिचे संचित असते. यानुसार तिला चालू जन्मात चांगले-वाईट भोग भोगायचे असतात. त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. व्यक्तीचे ‘संचित आणि प्रारब्ध’ यांनुसार तिच्या बुद्धीचे कार्य ठरते.

२. व्यक्तीच्या शरिरात शक्तीचे कार्यानुरूप वर्गीकरण होत असणे

व्यक्तीच्या मूलाधारचक्रात जीवनशक्तीचा वास असतो. यात व्यक्तीची एकूण शक्ती असते. तिला ‘समग्र शक्ती’, असे म्हणतात. व्यक्तीच्या शरिरात त्या शक्तीचे विविध कार्यांनुसार वर्गीकरण होते. अशा शक्तीला ‘विग्रह शक्ती’, असे म्हणतात. व्यक्तीतील शक्तीचा विनियोग शरिराच्या कार्यासाठी सौम्य प्रमाणात, त्यानंतर मनाच्या कार्यासाठी मध्यम प्रमाणात आणि मेंदूच्या कार्यासाठी सर्वाधिक प्रमाणात होतो.

३. बुद्धीचे कार्य

व्यक्तीचा डावीकडील मेंदू हा ‘ज्ञान, प्रगल्भता, निश्चयात्मक बुद्धी, आकलनक्षमता आणि ग्रहणक्षमता’ यांच्याशी संबंधित असतो, तर उजवीकडील मेंदू ‘भावना, कल्पकता, विस्तारवृत्ती, अभ्यास आणि चिकित्सक वृत्ती’ यांच्याशी संबंधित असतो.

४. दोन्ही हातांच्या तळव्यांच्या छटा भिन्न असण्याचे कारण

काही व्यक्तींची प्रकृती तिच्या डाव्या मेंदूशी संबंधित असते. त्यामुळे तिच्यातील शक्तीचा सर्वाधिक विनियोग तिच्या शरिराच्या डाव्या बाजूने होतो. त्याचा परिणाम म्हणून व्यक्तीचा डावा हात उजव्या हाताच्या तुलनेत गोरा दिसतो.

याउलट काही व्यक्तींची प्रकृती तिच्या उजव्या मेंदूशी संबंधित असते. त्यामुळे तिच्यातील शक्तीचा विनियोग तिच्या शरिराच्या उजव्या बाजूने अधिक होतो. त्यामुळे अशा व्यक्तीचा उजवा हात डाव्या हाताच्या तुलनेत गोरा दिसतो.

मनुष्याच्या दोन्ही हातांच्या रंगाची छटा ‘तिची प्रकृती आणि बुद्धीचे कार्य’, यांवर अवलंबून असते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १९.११.२०२५, वेळ सकाळी १०.२६ आणि एकूण कालावधी १० सेकंद)