
मुंबई – मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून पनवेल बसस्थानकाकडे पाहिले जाते. या स्थानकातून प्रतिदिन ३ सहस्रांपेक्षा अधिक बसगाड्यांची ये-जा होते; मात्र वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा अत्यंत तोकड्या पडत आहेत. राज्यशासनाने पनवेलमध्ये अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याच्या अनेकदा घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्षात येथील परिस्थिती अत्यंत दयनीय असून प्रशासन अद्यापही उदासीन आहे. ‘सनातन प्रभात’ने केलेल्या पहाणीत या स्थानकातील अनेक गंभीर समस्या आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.


मुंबई आणि ठाणे येथे सुटणार्या गाड्यांसाठी फलाट आणि पाटी नसणे

सध्या ठाणे, मुंबई येथे जाणार्या गाड्या उभे रहाण्याची जी जागा आहे, तिथे कुठल्याही प्रकारचे छत नाही. त्यामुळे प्रवाशांना कडक उन्हात किंवा पावसात गाड्यांची वाट पहात उभे रहावे लागते. काही वेळा हा वाट पहाण्याचा कालावधी अर्धा ते पाऊण घंट्यापेक्षाही अधिक असतो. तिथे कुठल्याही प्रकारचा बसगाडीचा ‘थांबा’ किंवा आडोसा नाही. त्यामुळे मुलेबाळे किंवा वृद्ध यांना सांभाळून, तसेच छत्री, सामान आदी सांभाळत प्रवाशांना त्यांची बस आली आहे का पहाणे आणि नसल्यास परत जागेवर मागे येणे, ही कसरत मोठ्या प्रमाणात करावी लागते. महिला प्रवाशांना हे करणे अधिकच कठीण जाते. ऊन किंवा पाऊस यांमुळे लांबून येणार्या गाडीवरील गावाच्या नावाची पाटीही व्यवस्थित पहाता येत नाही. येथे फलाट नसल्याने कुठे जाणार्या गाड्या सुटणार त्याची पाटीही येथे नाही, त्यामुळे नवीन प्रवाशांची गैरसोय होते.

खड्डे, चिखल आणि अस्वच्छता !

बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे आहेत. पावसाळ्यात येथे चिखलाचे साम्राज्य होते. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी जीव मुठीत धरून कसरत करावी लागते.
आगाराच्या मागील बाजूस असलेल्या वाहनतळाच्या परिसरात कमालीची अस्वच्छता असून तिथे पाणी साचल्याने शेवाळे पसरले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

गर्दुल्ल्यांचा वावर !
बसस्थानकात पूर्वी असलेला पोलीस कक्ष आता बंद पडला आहे. संकटकाळात पोलीस संपर्क केल्यावर येतात; मात्र घटना घडू नये, यासाठी कायमस्वरूपी उपस्थिती दिसत नाही. याचाच अपलाभ घेत स्थानक परिसरात गर्दुल्ले आणि भिकारी यांनी ठाण मांडले आहे. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिवहन विभागाने जप्त केलेल्या गाड्या येथेच उभ्या केल्या जात असल्याने आगाराच्या परिसरातील जागा व्यापून गेली आहे.
पूर्वी ठाणे येथे सुटणार्या गाड्यांसाठी असणारा फलाट आता बंद आहे. त्याच्या नावाच्या समोरच झाडाच्या फांद्या आल्या आहेत. येथे कोणतीही स्वच्छता नाही आणि अनधिकृतरित्या पत्रकेही लावण्यात आलेली नाहीत. फलाट बंद असल्याने काही जण तिथे झोपतही आहेत.
सर्वाधिक महसूल तरीही सुविधांपासून वंचित का ?
पनवेल आगार हे मुंबई विभागातील एकमेव आगार आहे, जिथून विद्यार्थ्यांना सर्वाधिक बस पास दिले जातात. एवढा मोठा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत असूनही हे आगार मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित का ?
प्रशासनाची उदासीनता, पण कर्मचार्यांची तत्परता !
एकीकडे वरिष्ठ पातळीवर प्रशासकीय अनास्था दिसत असतांना, पनवेल आगारप्रमुखांनी स्थानिक लोकसहभागातून काही स्तुत्य उपक्रम राबवून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
१. शासनाच्या एका संचाव्यतिरिक्त कर्मचार्यांनी स्वतःच्या पुढाकाराने उन्हाळ्यात प्रवाशांसाठी २ अतिरिक्त शीतपेय (वॉटर कुलर) संच बसवले आहेत.
२. रंगकामाचा खर्च वाचवण्यासाठी खासगी संस्थांच्या साहाय्याने ‘डिजिटल प्रिंटेड’ बसपाट्या लावण्यात आल्या आहेत.
३. आगार व्यवस्थापकांनी स्थानिकांच्या साहाय्याने आगार परिसरात वृक्षारोपण करून सुशोभीकरण केले आहे. (जर सामान्य कर्मचारी लोकसहभागातून पालट घडवू शकतात, तर सरकारला अत्याधुनिक स्थानक उभारण्यास कोणता मुहूर्त हवा आहे ? – संपादक)
सकारात्मक गोष्टी
- सध्या येथे शौचालय आणि स्वच्छतागृह यांची सोय विनामूल्य आहे.
- तसेच मुंबई आणि ग्रामीण (कोकण-घाट) विभागासाठी २ स्वतंत्र खिडक्या कार्यरत आहेत आणि सुरक्षारक्षक बाकड्यांवर झोपणार्या मद्यपींना त्वरित हटवत आहेत, ही गोष्ट सकारात्मक आहे.
-बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह पाठवा !आपल्या भागातील बसस्थानकेही अस्वच्छ असल्यास, पिण्याचे पाणी, बसण्यासाठीची बाकडी, कचराकुंड्या अशा किमान सुविधाही नसल्यास, बसस्थानकांच्या अशा दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह ‘सनातन प्रभात’साठी ‘९२२५६३९१७०’ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करा ! हे वाचा → SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !नागरिकांना आवाहन !‘बसस्थानकांची स्वच्छता’ हे जसे एस्.टी. महामंडळाचे दायित्व आहे, तसेच ‘सुजाण नागरिक’ म्हणून आपलेही दायित्व आहे. ‘एस्.टी. ही सर्वसामान्यांचा आधार आहे’, याची जाणीव ठेवून बसस्थानके स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही या अभियानामध्ये योगद्यान द्यावे. सूचना नोंदवा !वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या दु:स्थितीविषयी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’ या लिंकवर ‘सनातन प्रभात’ने नोंदवली आहे. आपणही आपली सूचना त्वरित नोंदवा ! |
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !