हिंदु धर्मद्रोही प्रा. के.एस्. भगवान यांचे अश्लाघ्य वक्तव्य

दावणगेरे (कर्नाटक) – तुम्ही ज्या श्रीरामाची पूजा करता, ते दशरथाचे पुत्र नाहीत. श्रीरामाचे वडील दशरथ यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. त्या पूजेमध्ये राणीला पुरोहितासमवेत रात्र घालवावी लागते. जर राणीने पुरोहितासमवेत रात्र घालवली असेल, तर याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, असे अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान प्रा. के.एस्. भगवान यांनी केले. ते दावणगेरे जिल्ह्यातील हरिहर येथील बी. कृष्णप्पा मैत्रीवन येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. भगवान म्हणाले की, ‘राममंदिर कशासाठी हवे ?’ या माझ्या पुस्तकात मी हे लिहिले असून वाल्मिकी रामायणातही याचा उल्लेख आहे. (बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्या आराध्य दैवताप्रती असे कुणी बोलू तरी कसे शकते ? हिंदूंच्या भावनांना पायदळी तुडवणार्या अशांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना फासावर लटकवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक)
🚨 How Long Will Hindus Be Expected to Tolerate Such Insults?
Harihar, Karnataka: Hindu religion-critic Prof. K.S. Bhagwan has made yet another controversial statement, claiming that “Shri Ram was not the son of Dasharatha,” citing his interpretation of the Putrakameshti Yajna… pic.twitter.com/kWlNRzRPh5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2026
भगवान पुढे म्हणाले की,
१. शूद्र शंभुक, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांना रामानेच मारले. अशी व्यक्ती आपली आदर्श कशी असू शकते? (ज्या व्यक्तीचे समाजातील महत्त्वच नष्ट झाले आहे, ती व्यक्ती स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये करत आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)
२. पंचांग पहाणे आधी बंद करा, आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. ‘सर्व शूद्र हे ब्राह्मणांचे गुलाम आहेत’, असे मनुस्मृति सांगते. (भगवान यांनी लावलेल्या या शोधासाठी त्यांना आता ‘भारतरत्न’च द्यायला हवे ! – संपादक)
३. गांधीजींनी देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला या गुलामगिरीतून मुक्त केले.
४. लग्नाच्या वेळी पुरोहित जे मंत्र म्हणतात, त्याचा अर्थ तुम्हाला ठाऊक नसतो. मला मात्र हे ठाऊक असल्यामुळेच मी माझ्या लग्नात कोणत्याही पुरोहिताला न बोलावण्यास माझ्या वडिलांना सांगितले होते. (भगवान यांच्या मनोविकृतीमागील कारणे आता समजले. हिंदूंच्या श्रेष्ठ परंपरांचे, आध्यात्मिक मंत्रांचे संस्कारच ज्या व्यक्तीवर झालेले नाहीत, ते असेच बोलणार ! – संपादक)
५. सध्याची पाठ्यपुस्तके सत्याविना आपले सत्व गमावून बसली आहेत. स्वामी विवेकानंदांनी ‘आपण बौद्ध धर्माचे आहोत’, असे सांगितले होते. बौद्ध धर्म हा अत्यंत मानवतावादी आणि वैज्ञानिक धर्म आहे. माझ्या या वक्तव्यावर जर कुणाला गुन्हा नोंदवायचा असेल, तर त्यांनी संपूर्ण माहिती घेऊनच गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक येथील श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी धर्माभिमान जागृत होण्यासाठी भक्तांना केलेले मार्गदर्शन आणि ‘सनातन संस्थे’च्या साधकांविषयी काढलेले कौतुकाद्गार !
युवकांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सज्ज व्हावे ! – सचिन कल्याणशेट्टी, आमदार, भाजप
Violence In Manipur : मणीपूरमध्ये वांशिक हिंसाचार चालूच : आतंकवाद्यांकडे २७ प्रकारची १ सहस्राहून अधिक घातक शस्त्रे !
Youth Congress Leader Nizam Arrested: दक्षिण कन्नड जिल्हा युवक काँग्रेसचा नेता निझाम उपाख्य इब्राहिम याला अटक !
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार पी.सी. बराईक यांचे त्यागपत्र !