कुंभपर्व यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक ! - गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री

नाशिक – येथे पुढील वर्षी होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेचा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याने शुभारंभ झाला आहे. आगामी कुंभपर्व स्वच्छ, सुरक्षित आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना अन् नागरिक यांचा सहभाग आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभपर्वासाठी देश-विदेशातून येणार्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
Nashik Kumbh Mela 2027: Foundation Stone-Laying Ceremony and Ritual Worship of the Simhastha Kumbh Flagstaff Held in Nashik
Everyone's participation is essential for the success of the Kumbh Mela: Girish Mahajan, Kumbh Mela Minister
नाशिक l कुंभ मेला pic.twitter.com/JBf8XWCA0K
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघ, नाशिकच्या वतीने कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेदमंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभपर्व ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा कमला एकादशीच्या पर्वावर पवित्र रामकुंड, नाशिक येथे कुंभपर्व मंत्री श्री. महाजन यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, महापौर हिमगौरी आडके-आहेर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांचेसह विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, महंत उपस्थित होते.
वेदमंत्रांच्या घोषात, गोदामाईच्या साक्षीने…🚩 🔱
रामकुंडावर भव्य ५१ फूट धर्मध्वजाच्या शिलान्यास पूजनाचा पवित्र सोहळा संपन्न!
#Kumbhmela2027 #Nashik #NashikKumbhmela #सिंहस्थ_कुंभमेळा #GirishMahajan pic.twitter.com/1Cnub23qv5— Girish Mahajan (@girishdmahajan) June 11, 2026
या वेळी मंत्री महाजन म्हणाले,
१. पुढील वर्षी सिंहस्थ कुंभपर्वात मागील कुंभपर्वापेक्षा चार ते पाच पट अधिक, म्हणजेच १२ कोटींपेक्षा अधिक भाविक येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कुंभपर्व यशस्वी करण्याचे दायित्व शासन, प्रशासन आणि नागरिक यांचे आहे.
२. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संघटना आणि भक्तगण यांनी पुढाकार घेतला असून ही स्वच्छता केवळ एका दिवसापुरती नसून सातत्याने राखली जाईल.
३. देश-विदेशातून येणार्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक बनून पुढाकार घ्यावा.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते विधीवत् पूजा करुन गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात पूजन समारंभ भक्तीमय वातावरणात पार पडला.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा