रुग्णालयाचे कर्मचारी अलगीकरणात
(व्हेंटिलेटर म्हणजे श्वास घेण्यास साहाय्यभूत करणारे यंत्र. याने अत्यवस्थ स्थितीत असलेल्या रुग्णाचा प्राण जात नाही.)

थिरूवनंतपूरम् ( केरळम्) – केरळमध्ये यावर्षी निपाह विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण ४३ वर्षांचा असून तो कोळीकोडचा रहिवासी आहे. त्याचा चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात अतीदक्षतेची चेतावणी दिली आहे.
आरंभी या रुग्णाला हलका ताप आल्याने त्याला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. नंतर त्याला ‘कोळीकोड वैद्यकीय महाविद्यालया’च्या रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून सध्या तो ‘व्हेंटिलेटर’वर आहे. याविषयी आरोग्यमंत्री के. मुरलीधरन् म्हणाले, ‘‘रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आला होता. रुग्णालयाचे कर्मचारीही त्याच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या कर्मचार्यांसह अनेकांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तथापि कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही.’’
वर्ष २०१८ पासून केरळमध्ये सहाव्यांदा हा संसर्ग पसरला आहे. वर्ष २०२४ मध्ये याचे २ रुग्ण आढळले होते. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. निपाह संसर्ग हा मुख्यतः ‘फ्रूट बॅट्स’ (फळे खाणारी वटवाघळे) यांपासून पसरतो.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले