‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगात त्यांचे साधनेच्या पंचसूत्रीमधील ‘ऐकण्याची वृत्ती’ या विषयावरील मार्गदर्शन ऐकून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्याशी संबंधित सेवा करत असलेल्या साधकांच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सत्संग उत्साहाने ऐकणे
‘भक्तीसत्संगात ‘ऐकण्याची वृत्ती’ या सूत्रावर मार्गदर्शन चालू झाल्यापासून साधक सत्संग उत्साहाने ऐकतात. वयस्कर साधकही २ घंटे बसून सत्संग ऐकतात आणि सांगितलेले प्रयत्न करतात.
२. प्राधान्यक्रमानुसार सेवा करणे

धान्याच्या संदर्भातील सेवा करत असलेले बरेच साधक वयस्कर आहेत. पूर्वी हे साधक त्यांना निवडता येणारे धान्यच निवडायला घेत असत. आता त्यांना एखाद्या वेळी ‘हे धान्य आपल्याला प्रथम निवडायचे आहे’, असे सांगितल्यावर ते त्वरित ऐकतात.
३. प्रवास करून नवीन ठिकाणी सेवेला उत्साहाने जाणे
धान्याशी संबंधित सेवा करण्याच्या जागेत पालट झाला. तेव्हा साधक उत्साहाने नवीन ठिकाणी सेवेला जाऊ लागले. काही वयस्कर साधक बरीच वर्षे बसने प्रवास करून कुठेही गेले नव्हते. ‘ते साधकही बसने सेवेच्या ठिकाणी जायला वेळेत येऊ लागले’, याचे मला कौतुक वाटले.
४. सर्व साधक एकमेकांची काळजी घेतात आणि एकमेकांना साहाय्यही करतात.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञताभाव
वयस्कर साधक सतत म्हणतात, ‘‘प.पू. डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) आम्हाला एवढ्या मोठ्या आश्रमात रहायला दिले आहे. आम्हाला कशाचीच उणीव भासत नाही. आम्ही घरी असतो, तर आम्हाला एवढ्या सोयी मिळाल्या नसत्या. आम्ही येथे आनंदी आहोत.’’ त्यांच्या मनात प.पू. डॉक्टरांप्रती सतत कृतज्ञताभाव असतो.’
– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२६)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !