प्रत्युत्तरात इराणकडून अमेरिकी तळांवर आक्रमण
दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याचा धोका

न्यूयॉर्क – होर्मुझच्या सामुद्रधुनीत (२ जलाशयांना जोडणारा जलमार्गात) अमेरिकेचे अत्याधुनिक ‘अपाचे’ हेलिकॉप्टर कोसळले. इराणने हे हेलिकॉप्टर पाडल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या घटनेनंतर लगेचच अमेरिकी सैन्याने प्रत्युत्तर म्हणून इराणच्या २० ठिकाणांवर जोरदार आक्रमण केले. या नवीन आकम्रणामुळे इराण-अमेरिका युद्धबंदीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प या २ देशांमधील शत्रुत्व संपवून शांतता करार घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील होते.काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘एका महत्त्वपूर्ण करारापर्यंत पोचण्याच्या आम्ही पुष्कळ जवळ आहोत’, असा दावा त्यांनी केला होता; मात्र या ताज्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील युद्धाचा धोका अधिकच वाढला आहे.
१. ‘अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडणे, ही इराणची मोठी चूक होती’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘अमेरिका याला त्वरित आणि कठोर प्रत्युत्तर देईल’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
२. अमेरिकेने दावा केला होता की, इराणच्या ‘आत्मघाती ड्रोन’ने ‘अपाचे’ हेलिकॉप्टर पाडले; मात्र हेलिकॉप्टर इराणच्या आक्रमणामुळे कोसळले कि तांत्रिक बिघाडामुळे ?, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सुदैवाने दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे.
इराणचे प्रत्युत्तर !
इराणच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले की, अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडण्याचा इराणचा कोणताही हेतू नव्हता. अमेरिकेच्या आक्रमणानंतर इराणनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणचे म्हणणे आहे की, जेव्हा अमेरिकेने त्याच्या दक्षिण भागांत हवाई आक्रमण केले, तेव्हा इराणने प्रत्युत्तर म्हणून बहरीनस्थित अमेरिकेच्या नौदलाच्या सर्वंत मोठ्या मुख्यालयावर ड्रोनद्वारे आक्रमण केले. त्याही पुढे जाऊन इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या हवाई तळांवरही क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणी सरकारी प्रसारमाध्यमांच्या मते, ही संपूर्ण कारवाई अमेरिकेने इराणी ठिकाणांवर बाँबने केलेल्या आक्रमणांना दिलेले प्रत्युत्तर आहे.
POK Pakistani Helicopter Crash : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकचे हेलिकॉप्टर कोसळले : २१ ठार !
Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात आणखी एका हिंदु तरुणाची हत्या !
International Space Station : वर्ष २०३० पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निवृत्त होणार
China Pakistan Space Program : पाकिस्तानचा अंतराळ कार्यक्रम चीनच्या साहाय्याने चालू !
Pakistan’s Atrocities On POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानाकडून मानवी अधिकारांचे उल्लंघन ! – भारत
China’s Monopoly Rare Earth : बलाढ्य चीनचे ‘दुर्मिळ खनिजां’वर प्रक्रिया करण्याचे कठोर निर्बंध कायम !