दक्षता विभागाच्या धाडीत ५ आलिशान इमारती, १४ भूखंड, १.२५ किलोहून अधिक सोन्याचे दागिने आणि २ कोटी रुपये जप्त

कंधमाल (ओडिशा) – येथील बालीगुडा येथे कार्यरत असलेल्या ‘एकात्मिक आदिवासी विकास प्राधिकरणा’चे साहाय्यक कार्यकारी अभियंता बैकुंठ नाथ बेहरा यांच्या मालमत्तांवर दक्षता विभागाने घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी संपत्ती आढळून आली. त्यांच्या ‘बँक लॉकर’मधून २ कोटी रुपयांहून अधिक रोकड, १.२५ किलोहून अधिक सोन्याचे दागिने, तसेच ४५ लाख रुपयांच्या मदुत ठेवी आढळून आल्या.
Verification of deposits, investments being done by Finance Wing of #Odisha #Vigilance. Measurement/assessment of immovable properties being done by Vigilance Technical Wing. Searches continuing.
— Odisha Vigilance (@OdishaVigilance) June 6, 2026
अन्वेषणाच्या वेळी भुवनेश्वर आणि जाजपूर येथे बेहरा यांच्या मालकीच्या ५ बहुमजली आलिशान इमारती असल्याचेही उघड झाले. भुवनेश्वर, जाजपूर आणि बारीपाडा येथे मिळून १४ भूखंड असल्याचेही निष्पन्न झाले. बेहरा हे वर्ष १९९९ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून अवघ्या ६ सहस्र रुपये मासिक वेतनावर सरकारी सेवेत रूजू झाले होते. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याच्या संशयावरून दक्षता विभागाने भुवनेश्वर, जाजपूर, मयूरभंज आणि कंधमाल येथील विविध ठिकाणी धाडी घातल्या. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अन्वेषणासाठी कह्यात घेतले आहे.
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !