सांडपाण्याचे नियोजन करण्यात नगरपालिका अपयशी : हिंदूंकडून संताप व्यक्त
कारवार (कर्नाटक) – ‘दक्षिण काशी’ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण या तीर्थक्षेत्री अनर्थ घडला. येथील श्री महाबळेश्वर मंदिरातील ‘आत्मलिंग’ असलेल्या गाभार्यात सांडपाणी शिरले. मुसळधार पावसामुळे पवित्र आत्मलिंगाची जागा संपूर्ण दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याने भरून गेली होती. पुरोहितांनी बालद्यांच्या साहाय्याने तातडीने सर्व पाणी बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पुरोहित, तसेच स्थानिक जनता आणि सहस्रो भक्त यांनी ‘मंदिराच्या इतिहासात अशी वाईट अवस्था कधीच आली नव्हती’, अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त केला.
🚨 OUTRAGE IN GOKARNA
The sacred Atmalinga at Gokarna's Mahabaleshwar Temple has been submerged in sewage water due to gross negligence and administrative failure by the local municipality.
This is not merely a civic lapse; it is a grave insult to one of Hindu Dharma's most… pic.twitter.com/jXJlaYOmnz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 9, 2026
(ही छायाचित्रे /व्हिडिओ देण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून झालेले विडंबन कळावे, या उद्देशाने प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
मंदिरातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असूनही सांडपाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करू न शकणारी नगरपालिका आणि तिचे अधिकारी यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही केवळ तांत्रिक अडचण नसून मंदिराच्या इतिहासात घडलेला हा मोठा अनर्थ आहे. पवित्र क्षेत्राकडे अशा प्रकारे दुर्लक्ष केल्याला प्रशासकीय अधिकारीच थेट उत्तरदायी आहेत. यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी पुरोहितांनी दिली.
गाभार्यातून सांडपाणी बाहेर काढून तात्पुरत्या स्वरूपात गाभारा स्वच्छ करण्यात आला आहे. तथापि पाऊस असाच चालू राहिल्यास हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !