अनुसूचित जमातीला राजकीय आरक्षण देण्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सकारात्मक

पणजी, ७ जून (वार्ता.) – विधानसभेत अनुसूचित जमातीला राजकीय आरक्षण देण्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सकारात्मक आहेत. ही आरक्षण प्रक्रिया वेगाने करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार गोविंद गावडे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ७ जून या दिवशी देहली येथे भेट घेतली. या भेटीनंतर आमदार गोविंद गावडे यांनी ही माहिती दिली.
या वेळी गोव्याच्या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रमेश तवडकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक, सभापती गणेश गावकर आणि आमदार गोविंद गावडे यांचा समावेश होता. आमदार गोविंद गावडे पुढे म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समवेतच्या बैठकीमध्ये विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे. वर्ष २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत हे आरक्षण मिळावे, असा आग्रह या वेळी शिष्टमंडळाने धरला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि या प्रश्नी सहानभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.’’ कायदा संमत होऊनही प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याने अनेकांकडून नापसंती व्यक्त केली जात आहे आणि केंद्राने याप्रश्नी त्वरित अधिसूचना प्रसिद्ध करावी, अशी मागणी होत आहे.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले