
वर्धा, २ जून (वार्ता.) – स्वातंत्र्यानंतरही ज्यांच्या जीवनात केवळ उपेक्षाच आली, त्या राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर घराण्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या हालअपेष्टा, कारावास, अन्नान दशा आणि अपमान पचवून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात एकामागून एक ‘निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश’ या प्रतिज्ञेसह समिधा समर्पित केल्या. सावरकर घराण्यातील केवळ पुरुषच नव्हे, तर बाई (यशोदा – सावरकर यांचे मोठे बंधू बाबाराव (गणेश) सावरकर यांच्या पत्नी), माई (यमुना – सावरकर यांच्या पत्नी) आणि ताई (शांता – सावरकर यांचे सर्वांत लहान बंधू डॉ. नारायणराव (बाळाराव) सावरकर यांच्या पत्नी) यांनी कुणाचाही आसरा नसतांना मूकपणे जो त्याग केला, तो रणरागिणी झाशीची राणी, धर्मव्रती अहिल्याबाई, झुंजार दुर्गावती, वीरव्रती चेन्नमा यांच्याहून कुठेही अल्प नाही.

तीन सावरकर स्त्रियांनी हातात तलवार आणि बंदूक घेतली नसली, तरी त्यांनी स्वीकारलेले देशसेवेच्या सतीचे वाण न्यून पडत नाही. हिंदुत्व आणि राष्ट्र्रभक्ती यांचा मूर्तीमंत आदर्श असणार्या या तिघींच्या त्यागाचा इतिहास आज ना उद्या सुवर्णाक्षरांनी लिहावाच लागणार आहे, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक तथा स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याच्या अभ्यासिका डॉ. शुभा साठे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर सर्वश्री वर्धा जिल्हा संघचालक जेठानंदजी राजपूत, स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बोरकर, वाचनालयाचे सचिव गौरीशंकर टीबडीवाल, हरिभाऊ वझुरकर, नितीन पजई, मेजर शशिकांत देशपांडे (निवृत्त) उपस्थित होते. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
क्षणचित्रे
१. अनेकदा रक्तदान करणारे आणि दोन्ही कन्या सैन्यदलात भरती करणारे अमरावती येथील श्री. नितीन पजई अन् त्यांच्या धर्मपत्नी यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवारत्न सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.
२. कारगिल युद्ध आणि वाघा सीमेवर कामगिरी बजावणारे वर्धा येथील मेजर शशिकांत देशपांडे यांना ‘ज्येष्ठ नागरिक सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात आले.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर समितीच्या वतीने वर्ष २०२० मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन चरित्र आणि कार्य’ यावर आधारित विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट