घर, यंत्रमाग कारखाने आणि झाडेझुडपे यांत लपवले गोवंशीय !
महागड्या वाहनांतून केली जाणारी चोरटी वाहतूक उघड !

मालेगाव (नाशिक) – बकरी ईदच्या नावाखाली गोवंशियांची हत्या होऊ नये, यासाठी येथील पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही केली. घर, यंत्रमाग कारखाने, गल्लीबोळ आणि झाडेझुडपे यांच्यात लपवून ठेवलेल्या गोवंशियांना सोडवण्यात आले. महागड्या वाहनांत निर्दयीपणे कोंबून केलेली चोरटी वाहतूक उघडकीस आणत पोलिसांनी ९०६ गोवंशियांची हत्या रोखली.
🚨 906 cattle rescued during the Bakri Eid period in Malegaon; cases registered against 257 cattle smugglers
🔹 Cattle were hidden in homes, powerloom factories, and overgrown areas.
🔹 Illegal transportation through expensive vehicles was also exposed.
👏 Commendable action… pic.twitter.com/dfQpqceRw2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
पोलिसांनी मालेगाव विभागांतर्गत एकूण १५५ धडक कारवाया केल्या. यात २५७ गोतस्करांविरोधात सुधारित गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी ‘गो स्कॉड’ (विशेष पथक) तैनात करून नाकाबंदी केली होती. या कारवाईत एकूण ९०६ गोवंशियांची सुटका करून ११० वाहने जप्त करण्यात आली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !