खेळाडू थोडक्यात बचावले !

कर्णावती (गुजरात) – ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभव झालेल्या ‘गुजरात टायटन्स’ संघाच्या खेळाडूंना घेऊन जाणार्या बसला आग लागली. ३१ मेच्या रात्री ही घटना घडली. या घटनेतून खेळाडू थोडक्यात बचावले.
Fire breaks out in a bus carrying players of the Gujarat Titans team in the IPL cricket tournament after the final.
The players had a narrow escape.
🎥 Courtesy @ahmedabadmirror pic.twitter.com/OaIINA1CGS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 1, 2026
कर्णावतीतील नरेंद्र मोदी मैदानावर ‘आय.पी.एल्.’चा अंतिम सामना संपल्यानंतर ‘गुजरात टायटन्स’ संघाचे खेळाडू बसने नियोजित हॉटेलमध्ये जात होते. बसमधील विद्युत् बिघाडामुळे अचानक ‘शॉर्ट सर्किट’ झाले आणि पहाता पहाता गाडीच्या आत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. धूर दिसताच बसचालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे बाहेर काढले. यानंतर तातडीने दुसर्या बसची व्यवस्था करून खेळाडूंना हॉटेलकडे मार्गस्थ करण्यात आले.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ