‘तुमच्यापेक्षा सैन्यदलप्रमुख आसिम मुनीर अधिक शक्तीशाली आहेत का ?’ या प्रश्नावर पाकच्या संरक्षणमंत्र्यांची उडाली भंबेरी !

सैन्यदलप्रमुख आसिम मुनीर आणि पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथील पत्रकार मेहदी हसन यांचा ‘बहुतेक देशांमध्ये सैन्यदलप्रमुख संरक्षणमंत्र्यांना उत्तरदायी असतात; पण पाकिस्तानात तुम्ही म्हणजेच संरक्षणमंत्री हे सैन्यदलप्रमुखांना उत्तरदायी आहात. हे खरे आहे का ?’ हा प्रश्न ऐकताच पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भंबेरी उडाली. आधी त्यांनी म्हटले, ‘नाही, असे नाही’; पण हसन यांना थेट उत्तर हवे होते. त्यांनी पुन्हा विचारले की, ‘सैन्यदलप्रमुख आसिम मुनीर हे तुमच्यापेक्षा अधिक शक्तीशाली आहेत का ?’ यावर ख्वाजा आसिफ प्रश्नाला बगल देऊ लागले आणि त्यांनी स्वतःला ‘एक राजकीय कार्यकर्ता’ असल्याचे सांगितले. यातून पाकिस्तानची खरी सत्ताव्यवस्था पूर्णपणे उघड झाली.

मेहदी हसन वारंवार हेच विचारत होते; पण प्रत्येक वेळी ख्वाजा आसिफ यांचे उत्तर सत्य लपवणारेच होते. पाकिस्तानची राज्यघटना सांगते की, देशाचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती आहेत आणि सरकार नागरी नेतृत्वाच्या अधीन आहे; पण वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. जनरल आसिम मुनीर हे सध्या पाकिस्तानमधील सर्वांत शक्तीशाली व्यक्ती आहेत आणि जगासमोर पाकिस्तान हे मान्य करू शकत नाही.

संपादकीय भूमिका

जे सत्य आहे, ते पाकचे शासनकर्ते कसे मान्य करतील आणि स्वतःचे हसे कसे करून घेतील ?