धायरी (पुणे) येथील निकृष्ट रस्ताप्रकरणी ठेकेदाराला १० लाख रुपयांचा दंड !

 

पुणे – धायरीतील उंबर्‍या गणपति परिसरात २ महिन्यांपूर्वी जलवाहिनी घालतांना खोदलेला रस्ता दुरुस्त न करता तसाच ठेवला होता. रस्त्याच्या पुनर्बांधणी केलेल्या सिमेंट-काँक्रीटच्या कामांत गंभीर त्रुटी आढळल्या. ठेकेदारावर १० लाख रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. जलवाहिनीसाठी खोदलेला रस्ता २६ मे या दिवशी सिमेंट-काँक्रीट टाकून पूर्ववत् करण्यात आला. रस्ता सुकण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने रस्त्यावरून लगेच वाहनांची ये-जा चालू होती. परिणामी रस्ता पुन्हा खराब झाला.

संपादकीय भूमिका

अशा ठेकेदारांना केवळ आर्थिक दंड न करता त्यांना कायमचे काळ्या सूचीत टाकायला हवे !