चित्रकूट (मध्यप्रदेश) येथील घटना
लाईनमन आणि ऑपरेटर यांना मारहाण
जनतेकडून आंदोलन

सतना (मध्यप्रदेश) – सतना जिल्ह्यातील चित्रकूटमध्ये न्यायाधीश राम अवतार पटेल यांनी त्यांच्या घरी खंडित झालेली वीज पुन्हा आणण्याच्या नादात संपूर्ण शहराची वीज कापली. एवढेच नाही, तर न्यायाधिशांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी लाईनमन आणि ऑपरेटर यांना मारहाणही केली.
Chitrakoot (Madhya Pradesh):
Judge orders power supply to the entire locality to be disconnected because electricity was not restored to his home.Lineman and operator assaulted. Public protests follow the incident.
Such incidents raise serious questions about how a judge… pic.twitter.com/JXp6QRzpCO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 1, 2026
१. २८ मेच्या रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यामुळे संपूर्ण चित्रकूटचा वीजपुरवठा खंडित झाला होता. विद्युत् विभागाने बिघाड दुरुस्त करून दुसर्या दिवशी संध्याकाळी वीजपुरवठा सुरळीत केला होता; मात्र न्यायाधीश राम अवतार पटेल यांच्यासह तिघांच्या घरी वीज आली नाही. या रागाच्या भरात न्यायाधीश २ पोलीस कर्मचार्यांना घेऊन रजौला येथील ३३/११ केव्ही सब-स्टेशनवर पोचले. तिथे त्यांनी ऑपरेटर पंकज सेन यांना धमकावले की, ‘संपूर्ण शहराची वीज कापली, तरी चालेल; पण त्यांच्या घरी वीज आली पाहिजे.’ त्यांच्या सांगण्यावरून संपूर्ण रजौलाची वीज कापण्यात आली आणि लोकांना पुन्हा एकदा वीज संकटाचा सामना करावा लागला.
२. दुसर्यांदा वीज गेल्यामुळे लोकांची गर्दी पॉवर हाऊसवर पोचली आणि त्यांनी आंदोलन चालू केले. गर्दी पाहून न्यायाधीश तिथून निघून गेले. शहराची वीज कापणार्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करावा, अशी मागणी लोकांनी केली.
३. ऑपरेटर पंकज सेन यांनी सांगितले की, त्यांचा भ्रमणभाष संचही हिसकावून घेतला गेला होता. या वेळी न्यायाधिशांसमवेत आलेल्या दोन पोलीस कर्मचार्यांनी लाईनमन संजय सेन यांना मारहाण केली. पोलिसांनी ऑपरेटरच्या तक्रारीवरून गुन्हा प्रविष्ट केला आहे.
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
श्री कटमगाळदादा देवाकडे गार्हाणे घालून फर्मागुडी येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ला काही जणांचा विरोध
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !