
तेहरान (इराण) – इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी त्यागपत्र दिल्याचे वृत्त जगभरात प्रसारित झाल्यावर स्पष्टीकरण दिले आहे. पेजेश्कियन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ते त्यांचे पद सोडत नसून नेहमीप्रमाणे सर्व दायित्व पार पाडत आहेत. माझे काम चालूच ठेवीन आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.
जनतेपासून काहीही लपवणार नाही ! – पेजेश्कियान
पेजेश्कियन पुढे म्हणाले की, आम्ही इराणच्या जनतेसमोर समस्या वास्तविक स्वरूपात मांडतो. विद्यमान संकटांच्या गांभीर्याविषयी लोकांसमवेत पारदर्शकता असणे आवश्यक आहे, जेणेकरून आव्हानांचा सामना मिळून करता येईल.
सत्तेवरील इस्लामी सैन्याच्या नियंत्रणामुळे त्रस्त असल्याचा दावा
त्यागपत्राच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तात पेजेश्कियान यांचे विधान देण्यात आले होते. यात त्यांनी ‘देशाच्या सत्तेवर आता ‘इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’च्या कमांडरांचे पूर्ण नियंत्रण आहे. फेब्रुवारीमध्ये इराणचे अमेरिका आणि इस्रायल यांच्याविरुद्धचे युद्ध चालू झाल्यापासून माझ्या सरकारला महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेतून वगळण्यात आले’, असे म्हटल्याचा दावा करण्यात आला होता.
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !
Keir Starmer resigns : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे त्यागपत्र