सायप्रस, ग्रीस आणि आर्मेनिया या तिघा शेजारी देशांना भारताचे संरक्षण सहकार्य !

  • पाकिस्तानचा समर्थक तुर्कीयेला भारताने घातला भूराजकीय वेढा !

  • ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तुर्कीयेने पाकला पुरवले होते ड्रोन आणि सैनिक

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

इस्तंबुल (तुर्कीये) /नवी देहली – तुर्कीये पाकचा समर्थन करत आल्याने गेली अनेक वर्षे भारताचा धोरणात्मक शत्रूच राहिला आहे. संयुक्त राष्ट्रांत काश्मीरच्या प्रश्नावरून पाकची बाजू नेहमीच उचलून धरणार्‍या तुर्कीयेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळीही त्याचे पाकला भारताच्या विरोधात वापर करण्यासाठी ड्रोन आणि त्याचे तज्ञ असणारे सैन्याधिकारी दिले होते. आता या सगळ्यात भारताने तुर्कीयेला त्याच्या शत्रू राष्ट्रांना साहाय्य करून वेढा घालण्यास आरंभले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हे तुर्कीयेचा शेजारी देश सायप्रसला पोचले आहेत. सायप्रसने भारताकडे हवाई संरक्षण प्रणाली, तसेच ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची मागणी केली आहे. दुसरीकडे तुर्कीयेचे अन्य शेजारी देश ग्रीस आणि आर्मेनिया या देशांनाही भारताने संरक्षण सहकार्य केले आहे.

१. भारत ग्रीसला शस्त्रास्त्रे पाठवणार आहे. ग्रीसनेही ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली.

२. दुसरीकडे २८ मे या दिवशी आर्मेनियाने त्यांच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनाच्या वेळी भारताकडून मिळालेल्या घातक शस्त्रास्त्रांचे जगाला प्रदर्शन केले. यांत ‘पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर’, ‘आकाश १ एस्’, ‘होवित्झर’ तोफ, ‘स्वाती रडार सिस्टम’ आदी गोष्टींचा समावेश होता.

आर्मेनियाच्या लष्करी संचलनात ‘भारतात निर्मित’ पिनाका MBRL.

३. या सगळ्यामुळे तुर्कीयेचे काही तज्ञ धोका निर्माण होण्यापूर्वीच ग्रीसवर आक्रमण करण्याचा तुर्कीयेला सल्ला देत आहेत. (तुर्कीयेसारखे तज्ञ भारताकडे नाहीत का ? ‘पाकच्या आतंकवाद्यांकडून आक्रमणे होण्यापूर्वीच पाकवर आक्रमण करा’, असे का ते सांगत नाहीत ?- संपादक)

संपादकीय भूमिका

४ सहस्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या तुर्कीयेला भारताकडून आव्हान देणे, ही भारताची महाशक्तीच्या दिशेने आगेकूच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये !