आईचा प्रियकर फरार

चंद्रपूर – येथे स्वतःच्या २ मुलांची २ लाख रुपयांना विक्री केल्यानंतर महिलेने तिच्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचे ठरवले होते. पोलिसांनी हा डाव उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आईसह नवजात बाळाची खरेदी करणार्या २ महिलांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मुलीवर अत्याचार करणारा प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या चौघांवर मानवी तस्करी आणि पॉक्सोअंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मुख्य आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती अजय फुलझेले याच्या समवेत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहात होती. तिची १५ वर्षांची मुलगीही त्यांच्यासमवेत होती. काही कालावधीने अजयने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. यातून ती गरोदर राहिली. हा प्रकार उघड होऊ नये, यासाठी अजयसह मुलीच्या आईने तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती करतांना तिचे वय २० वर्षे सांगितले. पुरात कागदपत्रे वाहून गेल्याचे खोटे सांगितले. वैद्यकीय चाचणीच्या वेळी आधुनिक वैद्यांना संशय आल्याने हा प्रकार उघड झाला.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज