तृणमूल काँग्रेसचे आसामचे प्रदेशाध्यक्ष अभिजीत मजूमदार यांचे त्यागपत्र
हिंदुत्वावर विश्वास ठेवणारी कोणतीही व्यक्ती तृणमूल काँग्रेसमध्ये राहू शकत नाही, असाही केला दावा !

गौहत्ती (आसाम) – बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. आता तृणमूल काँग्रेसचे आसामचे प्रदेशाध्यक्ष अभिजीत मजूमदार यांनी पक्षाचे त्यागपत्र दिले आहे. मजूमदार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना ई-मेलद्वारे त्यागपत्र पाठवले आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचेही त्यागपत्र दिले. त्यांनी आरोप केला की, आता तृणमूल काँग्रेसचा अर्थ ‘तृणमूल मुस्लिम काँग्रेस’ असा झाला आहे. तो केवळ मुसलमानांसाठी काम करणारा पक्ष बनला आहे. हिंदुत्वावर विश्वास ठेवणारी कोणतीही व्यक्ती तृणमूल काँग्रेसमध्ये राहू शकत नाही.
🚨 TMC Exposed? Assam Chief Abhijit Majumdar Quits, Alleges Party Prioritises Muslims Over Hindus
Says that the party is increasingly inclined toward Bangladeshi immigrants and Muslim interests.
He also claimed that no person who believes in Hindutva can remain in the TMC.… pic.twitter.com/KmFsYWLsAB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 30, 2026
तृणमूलचे नेते हिंदूंच्या बाजूने कधीच बोलत नाहीत !
मजूमदार म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेपासून मी आसाम तृणमूल काँग्रेसचा सदस्य आणि सचिव होतो. तसेच मी पक्षाच्या माध्यम शाखेचाही प्रमुख होतो आणि यंदा गौहत्तीतून निवडणूकही लढवली होती. आसाममध्ये बांगलादेशी आणि मुसलमान लोकांकडे पक्षाचा अधिक कल आहे. पक्षाचे नेते हिंदूंच्या बाजूने कधीच बोलत नाहीत. मी हिंदु आहे आणि माझी विचारसरणी आहे, त्यामुळे पक्षात रहाणे योग्य नाही. आता आसाममध्ये तृणमूल काँग्रेसला विचारणारा कुणीही नाही.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !