सोलापूर येथे देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात आंदोलन

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा कायदा देवस्थानांच्या मालमत्तेवर शासन नियंत्रण आणण्याचा हा प्रयत्न असून हिंदु समाजाच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा, या मागणीसाठी सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेट) येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर सोलापूर जिल्हाधिकार्यांच्या वतीने तहसीलदार श्री. दिनेश पारगे यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक सर्वश्री विनोद रसाळ, हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे चंद्रकांत रामणशेट्टी, भाजपचे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, माजी नगरसेवक बापू ढगे, राष्ट्रभक्त परिषदेचे अधिवक्ता सतीश गाजूल, हिंदु राष्ट्रसेनेचे शहर प्रमुख रवि गोणे, हिंदु राष्ट्रसेनेचे जिल्हा संघटक आनंद मुसळे, वैष्णव मारुति मंदिराचे विश्वस्त नारायण दुभाषी, गोरक्षक विजय यादव यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !