
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सेवा करत असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी (७.५.२०२६ या दिवशी) मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव पूर्वी मिरज येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या खोलीतील केर काढत होते. तेव्हा मला खोलीत दैवी कण दिसले.
नंतर मी ध्यानमंदिराची स्वच्छता केल्यानंतर ‘ध्यानमंदिरातील प्रकाश पुष्कळ वाढला आहे’, असे मला जाणवले. त्या रात्री मी झोपण्यापूर्वी ध्यानमंदिरात आत्मनिवेदन करण्यासाठी गेले. त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर क्षणभर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे विराट रूप आले.’
– श्रीमती मधुरा तोफखाने (वय ६० वर्षे), सनातन आश्रम, मिरज, जिल्हा सांगली. (१४.५.२०२६)
दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक वाचत असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘१०.५.२०२६ या दिवशी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक वाचत होते. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. विशेषांकातील सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे छायाचित्र पाहून माझी भावजागृती झाली.
२. मी एकेक लेख वाचत होते. त्या वेळी ‘माझा श्वासोच्छ्वास संथ गतीने होत आहे’, असे मला जाणवले. मला शांत वाटत होते.
३. नंतर हळूहळू मला त्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील अक्षरे पिवळ्या रंगाची दिसू लागली.
४. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून मला चंदनाचा सुगंध येऊ लागला.
५. दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे प्रत्येक छायाचित्र मला सजीव भासत होते.
६. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रत्येक प्रसंग मी अनुभवत आहे’, असे मला वाटत होते.
७. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटून मला भावाश्रू अनावर झाले.’
– श्रीमती मधुरा तोफखाने (वय ६० वर्षे), (१४.५.२०२६)
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !