स्थानिक हिंदूंकडून संताप व्यक्त

भाग्यनगर (तेलंगाणा) – बकरी ईदनिमित्त भाग्यनगरमधील मुशिराबाद येथे पशूहत्येमुळे रस्त्यांवरून रक्ताचे पाट वहात असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. हे रक्त बांगलादेश मार्केटपासून ते आसपासच्या हिंदु वस्त्यांतील रस्त्यांपर्यंत पसरले होते. हे भीषण दृश्य पाहून स्थानिक हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात आला. भाग्यनगरमधील भाजपच्या ‘लीगल सेल’च्या (कायदा विभागाच्या) अधिवक्त्या नीलम भार्गवा राम यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ प्रसारित करून हा प्रकार उघड केला.
🚨 Bhagyanagar: Streets in some Hindu localities reportedly ran red with animal blood during Bakrid, triggering anger among local Hindus.
On other occasions, if a Hindu procession passes a mosque during a Hindu festival and a pinch of gulal accidentally lands near its premises,… pic.twitter.com/30ELNDGhez
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2026
सामाजिक माध्यमांत लोकांनी या घटनेवरून प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘पेटा इंडिया’सारख्या संस्थांना धारेवर धरले. ‘केवळ हिंदु सणांच्या वेळी उपदेश करणार्या या संघटना आता ही क्रूरता आणि अस्वच्छता यांविषयी गप्प का ?’, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. यासह ‘या कृत्यामुळे स्थानिक लोकांच्या धार्मिक भावना आणि सार्वजनिक स्वच्छतेचे उल्लंघन झाले आहे. धार्मिक परंपरांच्या नावाखाली अल्पसंख्य समाजाला अशा प्रकारे त्रास देण्याची मोकळीक दिली जाऊ शकत नाही’, असे लोकांचे म्हणणे आहे.
पोलीस प्रशासनाचे मौन !
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या गंभीर प्रकरणावर पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनी मौन बाळगले असून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !