
पालघर – मोगल भारतात येण्यापूर्वी येथील मुसलमान बांधव हिंदूच होते. मोगल आल्यानंतर येथील हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे भारतातील मुसलमान हे औरंगजेबाची नाही, तर हिंदूंचीच संतान आहेत, असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २७ मे या दिवशी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसलमानांनी बकरी ईदच्या निमित्ताने सोसायटीमध्ये कबर्या कापण्यासाठी आणल्याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि भाजप यांच्याकडून विरोध होत आहे. याविषयी पत्रकारांनी भूमिका विचारल्यावर रामदास आठवले यांनी अशा प्रकारे विरोध करणे चुकीचे असल्याचे म्हटले.
‘अडीच सहस्र वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक एकत्र रहात होते. सध्या राजकीय लाभासाठी कुणीही धार्मिक भावना भडकावू नयेत. मग ते भाजपचे लोक असोत किंवा अन्य कुणी. अशा पद्धतीने कुणालाही विरोध केला जाऊ नये’, असेही ते म्हणाले.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी