मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी बकरी ईदला ‘इस्कॉन’च्या जागतिक मुख्यालयातील गोशाळेत केली गोपूजा !

इस्कॉनच्या मुख्यालयात जाऊन गोपूजा करतांना बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी

नदिया (बंगाल) – बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी २८ मे या बकरी ईदच्या दिवशी नदिया जिल्ह्यातील मायापूर येथील ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस’च्या (इस्कॉनच्या) जागतिक मुख्यालयात जाऊन गोपूजा केली.

येथील गोशाळेत त्यांनी गायींना फळे आणि मिठाईही खाऊ घातली. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे; कारण त्यांनी इस्कॉनच्या वरिष्ठ संतांसमवेत बंगालचा आध्यात्मिक वारसा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी चर्चा केली.