
थिरूवनंतपूरम् (केरळम्) – प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील कोट्यवधी रुपयांची सोन्याची बिस्किटे आणि नाणी गहाळ झाली असून मंदिरात सुरक्षेची त्रुटी निर्माण झाली आहे, असे वृत्त गुप्तचर अहवालाच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले होते. या सर्व बातम्या मंदिराच्या प्रशासकीय मंडळाने पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. या सर्व केवळ खोट्या आणि निराधार अफवा असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
There is no security lapse at the Shri Padmanabhaswamy Temple, and the jewelry is also safe!" – Clarification from the temple administration
An investigation must be conducted to determine whether the clarification given by the administration is true or false#ReclaimTemples… https://t.co/ti3o1chuRb pic.twitter.com/gV3jxpcfzz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2026
१. मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसारित करून म्हटले की, भाविकांनी दिलेल्या देणग्यांचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही आणि सुरक्षेत त्रुटी आहेत, हे आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या पवित्र क्षेत्राची अपकीर्ती करण्यासाठी आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पद्मनाभस्वामी मंदिरातील अफाट संपत्ती आणि दागिने अत्यंत कडक सुरक्षा अन् पवित्र भावनेने सुरक्षित ठेवले जात असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
२. मंदिराचा संपूर्ण परिसर नेहमी सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या निगराणीखाली असतो. येथील सुरक्षा विभाग आणि पोलीस कर्मचारी यावर पाळत ठेवून असतात. कोणतीही मौल्यवान वस्तू एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवायची असली, तरी ती प्रथम सुरक्षा अधिकार्यांच्या निदर्शनास आणून त्यांच्या उपस्थितीतच नेली जाते. मंदिरात जाणार्या आणि बाहेर येणार्या प्रत्येक कर्मचार्याची कडक तपासणी केली जाते. असे असतांना मंदिरात कोणत्याही प्रकारची चोरी किंवा गैरव्यवहार झालेला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३. मंदिरात येणार्या भाविकांनी आणि जनतेने अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.
४. श्री पद्मनाभस्वामी मंदिर शतकानुशतके भक्ती, विश्वास आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून उभे आहे. भाविकांचा मंदिरावर असलेला विश्वास पूर्णपणे सार्थ असून घाबरून जाण्याचे किंवा चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin