वर्ष २०१५ मध्ये आलेला ‘देऊळबंद’ हा मराठी चित्रपट प्रत्येकाला भावला होता. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सुंदर जोडणी केली होती. या चित्रपटात राघव शास्त्री या वैज्ञानिकाचा संघर्ष सादर करतांना देशभक्तीचा सुंदर मुलामा होता. तरडे यांचे ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर २’ हे २ मराठी चित्रपट आल्यानंतर चित्रपटसृष्टीमधील आश्वासक अशी हिंदुत्वाकडील वाटचाल हिंदु भाविकांना सुखावणारी होती. या सर्वांमुळे प्रवीण तरडे यांच्याकडून ‘देऊळबंद २’ चित्रपटासाठी पुष्कळ मोठ्या अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात ‘देऊळबंद २’ चित्रपट पाहिल्यावर मात्र तरडे यांच्यासारख्या अक्कलकोट स्वामींचा भक्त म्हणवून घेणार्या दिग्दर्शकाला शेतकर्यांची व्यथा मांडतांना प्रारंभीपासूनच जाळीदार टोपी घातलेला मुसलमान एक शेतकरी का दाखवावा वाटला ? ‘सर्व देव एकच असतात’, असे सांगून ‘सर्वधर्मसमभावाची’ वाट चोखाळावीशी वाटावी, हे आश्चर्यकारक आहे. शेवटच्या प्रसंगात आत्महत्या करणार्या मुसलमान शेतकर्याच्या पायाखाली त्याची आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकर्यांच्या रूपातील अक्कलकोट स्वामी काठी घेऊन उभे रहातात आणि ‘एका मुसलमान शेतकर्याच्या साहाय्याला माझे स्वामी जाणार नाहीत का ?’, असा प्रश्न उपस्थित करून प्रवीण तरडे यांनी काय साध्य केले ? हा प्रश्न धर्मनिष्ठ आणि खर्या स्वामीभक्तांना पडल्याखेरीज निश्चित रहाणार नाही !

अध्यात्माचे महत्त्व बिंबवले नाही !
जसे अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एक चांगले मुसलमान पात्र जाणीवपूर्वक दाखवण्यात येते, जे हिंदूंच्या बरोबरीने इतरांना साहाय्य करते, नेमके तसेच या चित्रपटात एक मुसलमान शेतकर्याचे पात्र दाखवण्यात आले आहे. शेतकर्यांची व्यथा मांडतांना हा चित्रपट कुठेही अध्यात्माचे महत्त्व प्रेक्षकांच्या मनावर बिंबवत नाही.

चित्रपटातून नैतिकता, भक्तीभाव आणि अध्यात्म गायब !
एका प्रसंगात गायीला कसायाकडे विक्री होण्यापासून वाचवतांना स्वामी चक्क दानपेटीतील १६ सहस्र रुपये चोरतांना दाखवले आहेत. ‘भलेही या चित्रपटात मुख्य नायिकेने त्यांना स्वामींनी चमत्कार दाखवायचे नाहीत. एका सामान्य शेतकर्याप्रमाणे राहून दाखवा’, असे सांगितले असले, तरी रात्री इतरांसमवेत जाऊन स्वामींनी चोरी केलेली दाखवणे, हे धक्कादायक आहे. ‘देऊळबंद’ चित्रपटात ‘परिक्रमा आहे, देवाचे महत्त्व सतत अधोरेखित होण्यासह भक्तीभाव वाढतो; पण ‘देऊळबंद २’मध्ये मात्र तसे काहीच होत नाही. शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतांना ‘भक्तीभावाचा ओलावा’, या चित्रपटातून पूर्णपणे हरवला आहे. हा चित्रपट कुठेही अध्यात्म, नामस्मरण याची वाट चोखाळत नाही. ज्या स्वामींनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार केले आणि आजही अनेक स्वामीभक्त ते अनुभवतात, त्या स्वामींच्या तोंडून ‘जादूटोणा चमत्कार असल्या गोष्टी मला आवडत नाहीत’, असे सांगून स्वामीभक्त असलेल्या प्रवीण तरडे यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे अत्यंत चांगल्या दिग्दर्शकाचा ‘सर्वधर्मसमभावाची वाट चोखाळून स्वामीभक्तांची भ्रमनिरास करणारा देऊळबंद २ मराठी चित्रपट’, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर. (२३.५.२०२६)
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?