
१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रिये’चे जनक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘ईश्वरप्राप्ती ’या ध्येयाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे किती महत्त्वाचे आहे’, याचे गांभीर्य निर्माण करणे : ‘मनुष्यजन्म हा ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी झालेला असतो. ‘साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटणे’, हेच साधकांचे ध्येय असायला हवे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण आम्हा साधकांना लाभली आहे. कलियुगात मनुष्य षड्रिपूंनी ग्रासला आहे. मनुष्याला त्याच्या मूळ ध्येयाचा विसर पडला असून तो भौतिक सुखाच्या मागे धावत आहे, तसेच तो मायेत गुरफटला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘ईश्वरप्राप्ती’ या ध्येयाची जाणीव करून दिली आणि हे ध्येय साध्य होण्यासाठी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे किती महत्त्वाचे आहे’, याचे गांभीर्य साधकांमध्ये निर्माण केले आहे.
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष न्यून होण्यासाठी त्यावर स्वयंसूचना देऊन स्वभावदोषांवर मात करायला शिकवणे : मनुष्याच्या दु:खाचे मूळ हे त्याच्यातील ‘स्वभावदोष आणि अहं’ आहे. ‘स्वभावदोषांमुळेच मनुष्य सुखी आणि आनंदी जीवन जगू शकत नाही’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जाणले. ‘मनाला योग्य स्वयंसूचना देऊन आपण आपल्यातील स्वभावदोष आणि अहं न्यून करून आनंदी जीवन जगू शकतो’, हे त्यांनी साधकांना शिकवले. त्यांनी साधकांकडून झालेल्या चुका साधकांना फलकावर लिहायला सांगून चुकांविषयी प्रायश्चित्त घ्यायला सांगितले. साधकांमधील स्वभावदोष न्यून होण्यासाठी त्यावर स्वयंसूचना देऊन स्वभावदोषांवर मात करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय आहेत.
१ इ. आज सनातनचे साधक केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून आनंदी जीवन जगत आहेत.
१ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करावे ?’, या विषयांवर ग्रंथ संकलित करणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी हे ज्ञान ‘सनातनच्या साधकांपुरते मर्यादित न ठेवता याचा लाभ अखिल मानवजातीला व्हावा’, यासाठी त्यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन कसे करावे ?’, या विषयांवर ग्रंथ संकलित केले आहेत. समाजात ठिकठिकाणी संस्थेच्या वतीने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवण्यासाठी वर्गही घेतले जात आहेत.
२. स्वयंसूचना सत्र आणि लिखाण मनापासून न केल्याने साधकाला आनंद न मिळणे; मात्र त्याने स्वयंसूचना सत्र आणि लिखाण एकाग्रतेने केल्यावर त्याचे योग्य चिंतन होऊन त्याला आनंद मिळणे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभल्यावर त्यांनी साधकाला ‘‘आता तू आनंदी दिसतोस’’, असे सांगणे

पूर्वी माझ्याकडून स्वभावदोषांचे लिखाण मनापासून होत नव्हते आणि स्वयंसूचना सत्रेही मनापासून होत नव्हती. त्यामुळे मी घेतलेली स्वयंसूचना माझ्या अंतर्मनात जात नव्हती. प्रसंग घडल्यावर मी त्यात अडकून रहात असे. मला आनंद मिळत नव्हता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आनंद मिळण्यासाठी उपलब्ध करून दिली असतांना माझ्या मनात ‘मला त्यातून आनंद का मिळत नाही ?’, असा विचार येत असे. वर्ष २०२० पासून मी एकाग्रतेने स्वयंसूचना सत्र आणि स्वभावदोषांचे लिखाण करायला लागलो. एखादा प्रसंग घडल्यानंतर माझ्याकडून त्या संदर्भात चिंतन व्हायला लागले. ‘एखाद्या प्रसंगात मी कशा पद्धतीने योग्य विचार आणि चिंतन करायला हवे होते’, असा माझा विचार होऊ लागला. त्यामुळे मला आनंद मिळायला लागला. मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा ४ – ५ वेळा सत्संग लाभला. तेव्हा ते प्रत्येक वेळी मला म्हणाले, ‘‘आता तू आनंदी दिसतोस.’’
३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, म्हणजे मनाचे शस्त्रकर्म करणे
दु:खाचे मूळ कारण मन आहे; कारण मनात येणारे अयोग्य विचार दु:खाला कारणीभूत ठरतात, तसेच ते विचार चुकीची कृती करायला प्रोत्साहित करतात. शरिरातील एखाद्या अवयवात बिघाड झाला, तर शस्त्रकर्म करून त्यात न्यून-अधिक प्रमाणात का होईना सुधारणा करता येऊ शकते; मात्र मनातच काही बिघाड (मनाची अयोग्य विचारप्रकिया ) झाला, तर त्याचे शस्त्रकर्म कसे करणार ? मनाचे शस्त्रकर्म करणे, म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे ! ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून आपण आपले जीवन आनंदी करू शकतो. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून आपण आपल्या चित्तावरील अयोग्य संस्कार घालवून चित्त सत्च्या ठिकाणी स्थिर करू शकतो’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या लक्षात आले.
४. मनाचे शस्त्रकर्म करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एकमेवाद्वितीय आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या जीवनातील अंधकार नष्ट करून त्यांच्यामध्ये चैतन्याचा प्रकाश निर्माण केला आहे.
आम्हा साधकांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अतुल पवार, कोल्हापूर सेवाकेंद्र (७.४.२०२६)
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!