
इस्लामाबाद (पाकिस्तान) – काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने लाहोरमधील काही चौक आणि रस्ते यांची नावे त्यांच्या जुन्या हिंदु नावांवरून ठेवण्याची घोषणा केली होती. या निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. तसेच या निर्णयावरून पंजाब सरकारने खूप वाहवा मिळवली होती; मात्र आता देशातील कट्टरतावाद्यांपुढे झुकत पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी नावे पालटण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानची फसवेगिरी जगासमोर आली आहे.
१. मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी २० मार्च या दिवशी लाहोरमधील रस्ते, गल्ल्या आणि ऐतिहासिक महाविद्यालये यांना जुनी हिंदु नावे देण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानवर लागलेला कट्टरपंथीतेचा डाग पुसून काढण्यासाठी याविषयीची माहिती मुद्दाम प्रसारमाध्यमांना देण्यात आली होती.
२. या निर्णयानुसार लाहोरमधील ‘इस्लामपुरा’चे नाव ‘कृष्ण नगर’ करण्यात येणार होते, तर ‘बाबरी मशीद चौक’चे नाव ‘जैन मंदिर चौक’ असे करण्यात येणार होते.
३. मरियम नवाझ यांच्या या निर्णयावर पाकिस्तानमध्ये कुठलाही आवाज उठला नाही; पण आतून विरोध होत होता. अखेर जेव्हा प्रकरण वाढले, तेव्हा मरियम नवाज यांनी परिसराची नावे पालटण्याचा निर्णय पुढे ढकलला.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !