आरोपीला कर्नाटकातून अटक
क्रूरतेची परिसीमा ओलांडली आहे, हे दर्शवणारी घटना !

पुणे – ‘तू माझी नाही झालीस, तर कुणाचीही होऊ देणार नाही’, अशी धमकी पूर्वप्रेमीकेला दिली. तिच्यावर अॅसिडसदृश रासायनिक पदार्थ फेकून गंभीर घायाळ करणार्या श्रीराम मधु सरूनवर या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी कर्नाटक राज्यातून अटक केली. ही घटना २० मे या दिवशी रात्री २ वाजता ताडीवाला रस्त्यावर घडली. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
१. आरोपी आणि पीडिता यांचे प्रेमसंबंध होते. सध्या पीडिता आपल्या मित्राससमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (सहमतीने पती-पत्नी सारखे रहाणे) रहात होती. त्यामुळे आरोपीच्या मनात राग होता.
२. पीडिता आणि तिचा मित्र हे रात्री घरी परतत असतांना दबा धरून बसलेला आरोपी श्रीराम हा दोघांच्या समोर आला.
३. आरोपीने कोणतीही संधी न देता पीडितेच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर रासायनिक पदार्थ फेकला. त्यामुळे पीडिता भाजली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !