
पुणे – प.पू. गुरुवर्य प्रसाद महाराज अमळनेरकर (पंढरपूर-अमळनेर) यांच्या कृपाशीर्वादाने ‘अमळनेरकर महाराज सेवा संघ’, पुणे यांच्या वतीने कोथरूड, पुणे येथे ९ कुंडी ‘दत्त यागा’चे आयोजन केले आहे. या वेळी भारतातील विविध राज्यांमधून वैदिक ब्रह्मवृंदाद्वारे मंत्रघोषाने १२५ सपत्नीक यजमान वायनदान (यज्ञानंतर केलेले दान) करणार आहेत. या दत्तयागामध्ये वायनदानासहित भजन, कीर्तन, प्रवचन, तसेच नारिकेलासहित सप्तधान्याच्या गुरुतुला, गुरुपूजन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ३ दिवसांच्या कार्यक्रमासाठी महाराजांचे १० सहस्रांहून अधिक भक्तगण, आध्यात्मिक, तसेच राजकीय क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. त्याचप्रमाणे अधिकाधिक भाविक-भक्त यांनी दत्त याग, तसेच गुरुदर्शन इत्यादी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दत्त यागासाठी ‘श्री सखाराम महाराज अमळनेरकर संस्थाना’चे ११ वे गादीपती प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर हे पूर्ण ३ दिवस उपस्थित रहाणार आहेत. या काळात त्यांचे मार्गदर्शनही लाभणार आहे. २८ मे या दिवशी याग संकल्प आणि प्रायश्चित्ताने यज्ञाचा आरंभ होणार आहे. ३० मे या दिवशी पूर्ण आहुतीने सांगता होईल.
कार्यक्रम स्थळश्री शिवसमर्थ हॉल आणि लॉन, भवानीमाता मंदिराजवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे दैनंदिन कार्यक्रम दिनांक२८, २९ आणि ३० मे २०२६ सकाळी ८.३० ते दुपारी १२ – दत्त यागास प्रारंभ आणि वायनदान. दुपारी १२.३० ते २.३० – महाप्रसाद (भोजन) दुपारी ४.३० ते सायं. ६.३० – प्रवचन सायंकाळी ७ नंतर – हरिपाठ आणि कीर्तन |
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित