
भोर (जिल्हा पुणे) – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रतिवर्षी होणारी अवैध गोवंश वाहतूक आणि गोहत्या या वर्षी रोखण्यात यावी, या मागणीसाठी भोर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. येथील नायब तहसीलदार श्रीमती वैशाली जायगुडे-घोरपडे, प्रांत अधिकारी कार्यालयाच्या वतीने श्री. हरिदास चाटे, तसेच भोर पोलीस ठाणे अंमलदार खांडे यांना हे निवेदन देण्यात आले. गोहत्या करणारे आणि अवैध गोवंश वाहतूक करणारे गुन्हेगार यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

या प्रसंगी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, समस्त हिंदु आघाडी गोरक्षक दल भोर तालुका, रोहिडा गोमाता समिती, हिंदु जनजागृती समिती, सकल हिंदु समाज, भोर तालुका या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी