नागपूरच्या विकासात ‘गोदाम लॉजिस्टिक्स पार्क’ मैलाचा दगड !

नागपूर – सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पहाता उत्पादन आणि लॉजिस्टिक्स (मालवाहतूक) क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत; मात्र जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग होण्यासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणे आवश्यक असून ‘लॉजिस्टिक्स’वर होणारा खर्च न्यून करणे, हे सध्या उत्पादन क्षेत्रापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जिल्ह्यातील गोंडखैरी येथे ‘गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या वतीने उभारलेल्या ‘गोदाम लॉजिस्टिक्स पार्क’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास इंधन खर्चात मोठी बचत होईल. यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होईलच; पण पर्यायाने लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही लक्षणीयरित्या अल्प करता येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार