प्राण्यांच्या बळींवरील बंदीवर आक्षेप असेल, तर इस्लामी देशात निघून जा ! : Minister Agnimitra Paul

बंगालच्या मंत्री अग्नीमित्रा पॉल यांचे आमदार हुमायू कबीर यांना प्रत्युत्तर

मंत्री अग्नीमित्रा पॉल आणि आमदार हुमायू कबीर

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये भाजप सरकारने सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांचा बळी देण्यावर बंदी घातली आहे. यावर आम जनता उन्नयन पक्षाचे अध्यक्ष असणारे आमदार हुमायू कबीर यांनी विरोध करतांना ‘जोपर्यंत जग आहे, तोपर्यंत गायीचा बळी दिला जात राहील’, असे विधान केले होते.

या विधानावर राज्याच्या मंत्री अग्नीमित्रा पॉल यांनी उत्तर देतांना म्हटले की,

बंगालमध्ये रहायचे असेल, तर सरकारचे नियम पाळावेच लागतील. जर कुणाला कायद्याचा आणि नियमांचा आक्षेप असेल, तर ते दुसरीकडे किंवा इस्लामी देशांमध्ये जाऊ शकतात. (कबीर यांना बांगलादेश सर्वांत जवळचा देश आहे. कोलकात्यापासून ढाका अवघ्या साडेतीनशे किलोमीटरवर असतांना आता भाजप शासनानेच कबीर यांना बकरी ईदच्या आधीच तेथे पाठवण्याची व्यवस्था करावी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

गोहत्या करण्याची मागणी करणार्‍यांना सरकारकडून असेच उत्तर दिले जाणे अपेक्षित आहे आणि सरकार तेच करत असेल, तर सर्वत्र अशाच मानसिकतेचे सरकार असणे आवश्यक आहे !