
भारतात सध्या अनेक पालकांना त्यांच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवणे, हा जणू एक ध्यास लागलेला आहे. आतापर्यंत मध्यमवर्गात विदेशात नोकरीला जायचे ध्येय असायचे. पूर्वी श्रीमंतांची मुले शिक्षणासाठी विदेशात जायची. आता मध्यमवर्गीयांच्या मुलांना केवळ नोकरीच नव्हे, तर शिक्षणासाठीही विदेशात जायचे असते. ‘मित्र जातो, म्हणून मी पण…’, अशा मानसिकतेच्या मुलांमुळे पालक ‘कर्ज’ काढूनही मुलांना परदेशात पाठवतात. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या एका भारतीय तरुणाकडे सर्व सुखसोयी आणि ‘भरघोस वेतन असूनही एकाकीपणामुळे तो भारतात परत येण्याचा विचार करत आहे’, असे लिखाण त्याने ‘रेडिट’वर प्रसारित केल्यामुळे त्याच्या सुखामागील खरे सत्य सर्वांना जाणवू लागले आहे. काहींनी त्याला याविषयी परत विचार करण्याचा सल्ला दिला आहे. काहींच्या मते जे मिळण्यासाठी सर्व जण धडपडतात, ते त्याच्या जवळ आहे, त्यामुळे त्याने ते सोडतांना विचार करावा. तो तरुण जसा वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेला, तसेच बरेच विद्यार्थी परदेशात जातात. काही विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण आणि रहाणीमान न झेपल्यामुळे ते परत येतात; मात्र शिक्षणासाठी घेतलेले कर्ज मग आयुष्यभर फेडत बसतात. काही जण यशस्वी होऊन तिथे किंवा भारतात गलेलठ्ठ वेतनाची नोकरी करतात; परंतु जीवनाचे अंतिम ध्येय हे पैसा असू शकत नाही, हे उमगले नसेल, तर वरील तरुणासारखी मनस्थिती होण्याची शक्यता दाट असते.

प्रत्येकाने जीवनाचे काहीतरी ध्येय ठरवले पाहिजे. ते ध्येय साध्य करण्यात त्याला आनंद मिळतो. ‘मनुष्याला ईश्वरप्राप्तीसाठी जन्म मिळाला आहे’, हे धर्मशिक्षण हिंदूंना शिकवले जात नाही. त्यामुळे पैसा मिळूनही त्यांची अशी अवस्था होते. भारतीय एकत्रित कुटुंबपद्धतीत प्रेम, आधार, संरक्षण सारे काही मिळते. त्यामुळे परदेशात गेल्यावर सर्व भौतिक सुख मिळूनही एकटे वाटणे साहजिक होते. तिकडे ‘पब’सारखे सार्वजनिक जीवन असते; पण तो क्षणिक सुखाचा मार्ग एखाद्या तरुणाला कौटुंबिक माया आणि संरक्षण आदी देऊ शकत नाही, हेच या उदाहरणावरून लक्षात येते. एकटेपणातून नकारात्मकतेचा जन्म होतो आणि काही जण आत्महत्याही करू शकतात. प्रत्येक सुख पैशाने विकत घेता येत नाही. मित्र, कुटुंब यांच्या प्रेमावर प्रत्येक जण जगत असतो. येथे मनाला सुसंस्कृत, विवेकी आणि भक्तीमार्गावर नेणार्या, तसेच मनःशक्ती वाढवणार्या समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘मनाच्या श्लोकां’ची आठवण येते. त्यातील काही भाग जरी आपण आत्मसात् केले, तरीही आपण योग्य मार्गावर राहू आणि आनंदी आयुष्य जगू. पैसा पुष्कळ आहे; पण मन अशांत असेल, तर आपण ते सुख उपभोगू शकत नाही. म्हणून मनाला सुसंस्कार, गुण, शिस्त आणि साधना यांनी आकार दिला, तर तीच जीवनाची खरी पुंजी ठरेल !
– श्री. आल्हाद माळगावकर, देवद, पनवेल.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !