कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांची हिजाबचे समर्थन करतांना हिंदु विद्यार्थ्यांना चेतावणी
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

बेंगळुरू (कर्नाटक) – शाळा आणि महाविद्यालये यांच्या आवारात हिजाब घालण्यास अनुमती दिलेल्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी ‘आवारात भगवे उपरणे घालून येणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी दिली.
बेंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना बंगारप्पा म्हणाले की, आमचे समानतेचे राजकारण आहे. हिजाबच्या संदर्भात भाजपची राजकीय भूमिका काय आहे, हे सर्वांना ठाऊक आहे; परंतु आम्हाला शिक्षण संस्थांमध्ये समानता आणणे महत्त्वाचे आहे. (एका धर्माच्या परंपरांना अनुमती देणे आणि दुसर्याला नाकारणे, ही काँग्रेसच्या लेखी समानता आहे का ? – संपादक) याबद्दल आमच्या निवडणूक जाहीरनाम्यातच स्पष्टपणे घोषणा केली होती. राज्यातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून बहुमत दिले आहे. (आता जनतेला पश्चात्ताप होत आहे ! – संपादक) आम्ही जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करून मतदारांचे ऋण फेडत आहोत. केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या केंद्रीय विद्यालयांमध्ये कोणते नियम आहेत, हे भाजपने जाणून घ्यावे. धाडस असेल, तर आधी तिथल्या विद्यार्थ्यांना भगवे उपरणे घालून पाठवावे. आमच्या राज्याच्या सरकारी शाळांमध्ये भगवे उपरणे घालायला कोणतीही अनुमती नाही. नियम मोडून कुणीही भगवे उपरणे घालून आल्यास कायदेशीररित्या कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी त्यांनी दिली.
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !