भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांचे गोवा सरकारला आवाहन

पणजी, २३ मे – गोव्यातील मठमंदिरे आणि संस्कृती यांच्या रक्षणार्थ उभारलेल्या संघर्षाची माहिती असलेले संग्रहालय उभारावे. यामुळे गोव्याला भेट देणारे पर्यटक आणि भावी पिढी यांच्यापर्यंत गोव्यातील संघर्षाची माहिती पोचण्यास साहाय्य होईल, असे आवाहन भाग्यनगरचे (हैदराबादचे) आमदार तथा ‘श्रीराम युवा सेने’चे संस्थापक अध्यक्ष श्री. टी. राजासिंह यांनी २३ मे या दिवशी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.
आमदार श्री. टी. राजासिंह पुढे म्हणाले, ‘‘फोंडा येथील मर्दनगड किल्ला हा छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वत: बांधलेला गोव्यातील एकमेव किल्ला आहे. हा किल्ला महाराजांचे शौर्य आणि धैर्य यांचे प्रतीक आहे. जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ हा पोर्तुगिजांनी हिंदूंवर लादलेल्या ‘गोवा इन्क्विझिशन’चा (धर्मच्छळाचा) एकमेव पुरावा आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे, इन्क्विझिशनच्या काळात केलेले अमानवीय अत्याचार आणि धर्मांतर यांची वास्तविकता आजच्या, तसेच पुढच्या पिढ्यांना कळणे आवश्यक आहे. गोवा सरकारने ‘गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे अन् अवशेष कायदा, १९७८’च्या अंतर्गत फोंडा येथील मर्दनगड आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण अन् संवर्धन करण्याविषयी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही ऐतिहासिक स्थळे लवकरात लवकर अधिसूचित करून या स्थळांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. गोवा सरकारने समुद्रकिनारपट्टीत बांगलादेशी आणि रोहिंगे यांना शोधून काढून त्यांना येथून हाकलले पाहिजे. गोव्यात धार्मिक संस्कृतीलाही प्रोत्साहन दिले पाहिजे.’’
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘फोंडा येथील मर्दनगड किल्ला आणि जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ संरक्षित करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न स्तुत्य आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला त्याच्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार दिलेला असतांना जुने बसस्थानक, फोंडा येथे २४ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचाराच्या फलकावर २० मेच्या रात्री काही हिंदुद्वेष्ट्यांनी अश्लील चित्रे काढली आहेत. स्वत:ला ‘डॉन’ संबोधणार्या एका व्यक्तीने सभेच्या विरोधात सामाजिक माध्यमात ‘पोस्ट’ (लिखाण) प्रसारित केली आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना विनाकारण डिवचण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. गोवा राज्य हे शरीयत कायद्यानुसार नव्हे, तर राज्यघटनेनुसार चालते, हे तथाकथित ‘डॉन’ आणि त्याचे समर्थक यांनी ध्यानात ठेवावे.’’
आमदार श्री. टी. राजासिंह म्हणाले, ‘‘गोव्याचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी आणि हिंदु समाजात राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाविषयी जागृती होण्यासाठी अखंडपणे कार्य करत आहे. देशभरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती निरंतर प्रयत्न करत आहे.’’
आमदार श्री. राजा सिंह यांची हात कातरो खांबाला भेट

आमदार श्री. टी. राजा सिंह यांनी दुपारी जुने गोवे येथील ‘हात कातरो खांबा’ला भेट देऊन धर्मरक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणार्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या वेळी आमदार टी. राजा सिंह यांच्यासमवेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर, श्री. रमेश शिंदे, गोरक्षक राजीव झा, श्री. सत्यविजय नाईक आणि इतर हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !