श्री राजमातंगीदेवी यज्ञाच्या वेळी आकाश ढगाळ होऊनही पाऊस न पडणे !             

श्री. भूषण गुंड

श्री राजमातंगी यज्ञाची पूर्णाहुती चालू होण्याच्या प्रारंभी वातावरण पुष्कळ उष्ण होते. त्या वेळी माझे कपडे घामाने भिजले होते. पुरोहितांनी पूर्णाहुतीचे मंत्रोच्चार करण्यास प्रारंभ केला, तेव्हा हवेतील उष्णता न्यून होऊ लागली. त्या वेळी आकाशाकडे लक्ष गेले, तेव्हा आकाश भगवे झाले होते. (वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे आयोजित केलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या वेळीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते धर्मध्वज फडकवतांना आकाश अशाच प्रकारे भगवे झाले होते.) पूर्णाहुतीच्या वेळी जेव्हा वायुदेवतेचा मंत्रोच्चार करण्यात आला, त्या वेळी वातावरणात थंड हवेचा संचार होऊ लागला. जसजसे मंत्रोच्चार होत गेले, तसतसे वातावरणातही पालट होऊन आकाश ढगाळ झाले. ‘आता कोणत्याही क्षणी पाऊस पडेल’, असे वाटू लागले. हा सर्व पालट मी आणि माझ्या शेजारील साधक अनुभवत होतो; मात्र देवाच्या कृपेमुळे त्या वेळी पाऊस पडला नाही आणि यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला.

– श्री. भूषण गुंड, ठाणे (१८.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक