
श्री राजमातंगीदेवी यज्ञासाठी एकूण १५ मैदाने पहाण्यात आली होती. त्यामध्ये श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जवळच्या नर्दुला टँक मैदानाची निवड झाली; परंतु मैदानाची अनुमती मिळण्यात अडचणी येत होत्या. हे मैदान अपयशी असल्याचीही अपकीर्ती आहे. येथे जो कुणी उमेदवार सभा घेईल, तो निवडणुकीत पराभूत होतो, असा आतापर्यंतचा अनुभव असल्याचे सांगत स्थानिक नागरिकांनी ‘या मैदानावर महायज्ञ घेऊ नये’, असे सांगितले. त्यातच हे मैदान मुळात खेळाचे आहे. त्यामुळे या मैदानात यज्ञसोहळा घेण्यास तेथील मुले विरोध करत होती. त्यांना यज्ञाचे महत्त्व समजावून सांगितल्यावर त्यांचा विरोध मावळला. श्री सिद्धिविनायक आणि श्री राजमातंगीदेवी यांच्या कृपेमुळेच मैदानात खेळणारी मुले सकारात्मक होऊन त्यांनी पुष्कळ सहकार्य केले.
श्री सिद्धिविनायक आणि श्री राजमातंगीदेवी यांच्या कृपेमुळे सर्व आध्यात्मिक अडथळे दूर झाले. महायज्ञाला अपेक्षेहून अधिक भाविकांची उपस्थितीही लाभली आणि त्यांनी यज्ञाचा दैवी अनुभवही घेतला.
महायज्ञाला श्री सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आहे, असे जाणवणे !

जागा निश्चित झाल्यावर यज्ञकुंडाच्या निर्मितीला प्रारंभ झाला. यज्ञकुंडाच्या निर्मितीचे काम चालू असतांना रात्री यज्ञकुंडाच्या अगदी मध्यभागी उभे राहिल्यावर श्री सिद्धिविनायक मंदिराचा कळस दिसत होता. तो पाहून महायज्ञासाठी एकप्रकारे श्री सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आहे, असे वाटले.
– श्री. सागर चोपदार, मुंबई
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती